विरभद्र मंदिराची यात्रा उत्साहात संपन्नइचलकरंजी : सालाबाद प्रमाणे याहीवर्षी मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी 2021.रोजी विरभद्र यात्रा संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात न करता थोड्याक्यात पण अतिशय उत्साहात यात्रा संपन्न  झाली. सकाळी 6.00 वाजता *महारुद्र अभिषेक* उद्योगपती *श्री बाळासाहेब सुतार* व *डॉ. माहातेंश जेऊर* यांच्या शुभहस्ते अभिषेक कार्यक्रम पार पडला यानंतर सकाळी 9.00 वाजता *गुगुळाचा* कार्यक्रम सुरू झाला यामध्ये एकूण 13 जोडी लोकचे गुगुळ संपन्न झाले त्या मध्ये त्यांच्या नातेवाईकांसह कुटुंबीय सहभागी होते याकरिता गोवा,गडिंग्लज, सांगली, कुपवाड, मिरज, इत्यादी ठिकाणाहून भक्तमंडळी आलेली होती. त्यानंतर 11.00 वाजता. *महिला मंडळाच्या* वतीने *सुहासिनी पूजन* करण्यात आले. दुपारी ठीक 12.00 वाजता *पालखी मिरवणूक* व *आरती* होऊन *अग्निकुंडचे पूजान* होऊन *अग्निप्रवेश* करण्यात आले. यानंतर *विरभद्र देवाची* आरती होऊन महाप्रसादाचे नैवेद्य  दाखवण्यात आले. व सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सदरचा महाप्रसाद मंडळाचे अध्यक्ष श्री देवेंद्र आमटे (आण्णा) यांच्या वतीने देण्यात आले व त्यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले. ही यात्रा संपन्न होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र आमटे, उपाध्यक्ष शिवकुमार मुरतले, सेक्रेटरी इराण्णा मट्टीकली, खजिनदार चिदानंद हलभावी, व सदस्य इराण्णा चचडी, प्रमोद हलभावी, प्रकाश वरदाई, सुभाष घुणकी, प्रकाश बाळीफडी, बाळासाहेब देवनाळ,विजयकुमार बाळीफडी, महेश बाळीफडी, युवक मंडळाचे अध्यक्ष चिदानंद जोतावर, नंदू हेरलगी, राजू हारुगेरी संतोष, हारूगेरी, संतोष बळगी, महेश देवगावकर, कुरूनशेटी मंडळाचे सर्व पदाधिकारी व मंडळाचे सर्व पदाधिकारी युवक मंडळाचे पदाधिकारी व सर्व महिला मंडळाच्या पदाधिकारी महिला मंडळाचे अध्यक्ष सुरेखा बाळाफडी, सौ कविता बाळीफडी श्रीमती महानंदा मुरतले, उमा कोळकी, गीता बाळीफडी, सौ मंजू देवळा, सौ राखी मूरतले, प्रिया वरदाई, नंदा हलवावी, गायत्री मुरतले, सौ भारती घुणकी सुवर्णा कुबसद, सौ तेग्गी, सौ. हेरलगी इत्यादी अनेक महिला सदस्य उपस्थित होत्या व समाजातील सर्व बंधू-भगिनी व सर्व भक्त मंडळी यांचे सहकार्य लाभले.

Post a comment

0 Comments