घटने मध्ये जो दिलेला अधिकार आहे तो दिव्यांगाना लागू करा.

 


इचलकरंजी: आनंद शिंदे : 

दिव्यांग कल्याण सेवा भावी संस्था इचलकरंजी वतीने मा लोकसभा अध्यक्ष ,मंत्र्यांना  व सर्व विभाग दिल्ली व मा राज्यसभा अध्यक्ष व संबंधित मत्रालय नागपूर येथे    दिव्यांगाना कल्याण सेवा संस्था सर्व   दिव्यांगाना  करिता मागण्या मान्य होण्याकरिता मोठ्या प्रमाणात मोर्चा काढुन इचलकरंजी प्रातंअधिकारी श्री विकास खैरत यानां आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे . निवेदनात  म्हटले आहे की लोकसभा ,राज्य सभा व विधानसभा मध्ये अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये दिव्यांगांच्या विविध मागण्या मान्य होण्याकरीता दिनांक 1/2/2021  रोजी मोर्चा आयोजित केला होता, त्या मागण्या पुढील प्रमाणे एक   दिव्यांगां करिता खासदार आमदार , जिल्हा परिषद ,महापालिका नगरपालिका, नगरपरिषद पंचायत समिती, ग्रामपंचायत या मध्ये   दिव्यांगाना करिता  प्रतिनिधी म्हणून संमतीने समाविष्ट करण्यात यावे  दोन दिव्यांगना  करिता म्हणून दोन तीन आणि चार चाकी वाहनांसाठी पेट्रोल डिझेल मध्ये 50 टक्के सवलत देण्यात यावी 3 दिव्यांगांच्या मुली मुलांना नोकरी मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे ,चार दिव्यांगांच्या लग्नाकरिता 100 टक्के अनुदान मिळावे 5 सर्व दिव्यांगाना विना अट विना जमीन लोन मिळावे 5 सर्व दिव्यांगांना रेल्वे प्रशासनाने मोफत प्रवास म्हणून इ , स्मार्ट कार्ड द्यावे 6 दिव्यांच्या मुली व मुलांना शिष्यवृत्ती योजना पूर्ण क्षमतेने चालू करावी.


 7 पंधरा जुलै 2020 मध्ये मा सुप्रीम कोर्टाने सर्व दिव्यांगांच्या साठी एस टी एनटी मध्ये समाविष्ट करावे असा आदेश केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाला दिला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे दिव्यांगांच्या करिता म्हणून महात्मा फुले व राजीव गांधी जीवनदायी योजनेचा 100 टक्के फायदा ध्यावा सर्व मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी संस्था चे अध्यक्ष अनिल पाटील सुधीर लोले प्रदिप देवधर असे अनेक दिव्यागं हजर होते

Post a comment

0 Comments