त्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर सातत्याने आंदोलने छेडावीच लागतील. या संदर्भात विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करेन....आमदार प्रकाशआण्णा आवाडे .


इचलकरंजी :  लॉकडाऊन काळातील घरगुती वीज ग्राहकांना प्रतिमहा 100 युनिटपर्यंत सवलत मिळावी, यंत्रमागासह सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी उद्योग योजना जाहीर करावी, मल्टिपार्टी कनेक्शन तातडीने द्यावे आणि शेतकर्‍यांना सौरऊर्जा युनिटसाठी 50 टक्के सबसिडी द्यावी आदी मागण्यांसाठी *ताराराणी पक्षाच्यावतीने व आमदार प्रकाशआण्णा आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब*  यांच्या नेतृत्त्वाखाली महावितरण कंपनी कार्यालयावर भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  प्रचंड मोठ्या संख्येने निघालेल्या *या रॅलीत सर्वसामान्य नागरिक, यंत्रमागधारक, युवक, महिला, लघुउद्योजक आदींसह तृतीयपंथी* सहभागी झाले होते. ताराराणी पक्ष कार्यालयापासून निघालेली रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन महावितरण कार्यालय पर्यंत काढण्यात आली. 

▪️इचलकरंजी शहर, दोन औद्योगिक वसाहती, आसपासची 12 गावे, लक्ष्मी औद्योगिक वसाहत, पार्वती औद्योगिक वसाहत असे सर्व मिळून सुमारे 1 लाख 16 हजार वीज ग्राहक आहेत. त्यामध्ये शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे 90 हजार घरगुती वीजग्राहक आहेत. या घरगुती ग्राहकांसाठीच 100 युनिटपर्यंतची सवलत मिळावी हीच आमची मागणी असून ती केवळ लॉकडाऊन काळापुरतीच लागू करावी. त्यासाठी दरमहा किमान 2.50 कोटी रुपये लागतील. तर यंत्रमाग आणि लघुउद्योगांसाठी 1 रुपयांची सवलत दिल्यास साडेतीन ते चार कोटी रुपये लागतील.  इचलकरंजी विभागातून वीज वितरण कंपनीला दरमहा 55 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे किमान तीन महिन्यांसाठी सवलत द्यायची झाल्यास दरमहा 7 कोटीप्रमाणे 21 कोटी रुपये लागतील. संपूर्ण सांगली जिल्ह्याचे उत्पन्न 52 कोटी रुपये तर कोल्हापूर शहरासह शिरोली, कोल्हापूर व गोकुळ एमआयडीसी व आसपासची गावे मिळून अवघे 23 कोटी रुपये उत्पन्न आहे. त्यामानाने इचलकरंजीतून मिळणारे उत्पन्न अधिक असून सवलतीची रक्कम अत्यल्प असल्याने कमी रकमेत महावितरणालाच लाभ होणार असल्याने शासनाने ही मदत देणे अत्यंत गरजेचे आहे, असे *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांनी सांगितले.

▪️कठीण प्रसंगात सरकारने जनता असो वा लघुउद्योग असो बळ देण्याची गरज आहे. इचलकरंजी शहरातून मोठ्या प्रमाणात कर जमा केला जातो. आम्ही देणारे आहोत, पण लॉकडाऊनमुळे आमच्यासमोर अडचण निर्माण झाल्याने आम्ही सरकारकडे भिक नको तर मदत मागत आहोत. पण त्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर सातत्याने आंदोलने छेडावीच लागतील. या संदर्भात विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करेन, असेही प्रतिपादन *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांनी केले.

▪️ या रॅलीत सौ. मौश्मी आवाडे (वहिनी), ताराराणी पक्षअध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, प्रकाशराव सातपुते, अहमद मुजावर, प्रकाश मोरे, विलास गाताडे, सतिश कोष्टी,आदित्य आवाडे, दीपक सुर्वे, संजय केंगार, राजू बोंद्रे, प्रा. शेखर शहा, प्रशांत कांबळे, नरसिंह पारीक, अविनाश कांबळे, राजगोंडा पाटील, राजू माने आदींसह नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, आवाडे समर्थक सहभागी झाले होते.

Post a comment

0 Comments