इचलकरंजी पालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करुन विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा खासदार धैर्यशील माने यांनी केली. इचलकरंजी  : दिल्लीतील महापालिका डिजिटल शाळांच्याध धर्तीवरइचलकरंजी पालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करुन विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा खासदार धैर्यशील माने यांनी आज शुक्रवारी करुन यासाठी आवश्यक तो निधी कमी पडू देणार नसल्याचे देखील सांगितले.

इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य प्रवेशव्दार कमानीच्या उदघाटन कार्यक्रमानंतर त्यांनी सदरची घोषणा केली.  

यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी तत्पर असल्याचे सांगत पालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करुन त्याठिकाणी विद्यार्थ्यांना अद्ययावत दर्जेदार ,गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकार आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. पालिकेच्या शाळा डिजिटल करुन गोरगरिबांची मुले अद्ययावत शिक्षण घेवून आजच्या स्पर्धेच्या युगात अधिक सक्षम व्हावीत ,याच उद्देशाने मी लोकप्रतिनिधी या नात्याने अधिक प्रयत्नशील असल्याचे सांगितले.त्यामुळे पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या सुमारे ७७०२ शाळा डिजिटल करतानाच सुमारे २९५ शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आपला निश्चित भर राहिल ,अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

यावेळी नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी ,उपनगराध्यक्ष तानाजी पोवार ,बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील ,शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे ,

नगरसेवक रविंद्र माने यांच्यासह सर्व पदाधिकारी ,नगरसेवक -नगरसेविका ,मराठा महासंघाचे पदाधिकारी व अन्य उपस्थित होते.

Post a comment

0 Comments