हुपरीचे माजी सरपंच सुभाष कागले स्विकृत नगरसेवकपदी नियुक्ती.हुपरी : 

हुपरीचे माजी सरपंच सुभाष कागले यांची भाजपा गोटातून हुपरी नगरपरिषद स्विकृत नगरसेवकपदी नियुक्ती झाली.यामुळे कागले समर्थकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. २००७ साली हुपरी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून सक्रिय राजकारणात दाखल झालेले सुभाष कागले हे आक्रमक निर्णय घेणारे सरपंच म्हणून प्रसिद्ध होते.कागले यांच्या काळातच भारत निर्माण पाणी योजना मंजूर झाली आणि त्यानंतर दौलतराव पाटील यांनी त्यांच्या सरपंच कारकिर्दीत दुधगंगेचे पाणी हुपरीत आणले.

सर्व पक्ष आणि नेतेमंडळींशी मैत्री जपणारे सुभाष कागले हे नगरपरिषद स्थापणेपासून भाजपा गोटात डेरेदाखल झाले आहेत.भाजपानिष्ठा जपताना नगरपरिषद कार्यालयात विविध कामांसाठी संपर्क आणि सर्व अभियानामध्ये सहभागी होण्यापासून मार्गदर्शकाची भुमिका सांभाळणाऱ्या सुभाष कागले यांचा हुपरी शहर भाजपाने यथोचित गौरवच केला आहे.

गुरुवारी हुपरी नगरपरिषद विशेष सभेत सुभाष कागले यांची स्विकृत नगरसेवकपदी नियुक्ती करणेत आली.यावेळी नगराध्यक्षा सौ.जयश्री महावीर गाट, उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे, प्रथम उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, पक्षप्रतोद रफिक मुल्ला,भाजपा शहराध्यक्ष बंडामामा वाईंगडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments