पोलीस नाईक विजय जयपाल घाटगे यांचा सकाळी हृदय विकाराने मृत्यू झाला हातकणंगले : प्रतिनिधी :

शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस नाईक विजय जयपाल घाटगे (वय - 38, सध्या रा. राजोपाध्यनगर, मुळ नरंदे ता. हातकणंगले) हे ऑन ड्युटी असताना आज सकाळी हृदय विकाराने त्यांचा मृत्यू झाला. पोलीस कर्मचाऱ्याच्या अशा आकस्मित मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

विजय घाटगे सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आले. त्यावेळी त्यांच्या छातीत कळ आली. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.सन 2007 मध्ये पोलीस दलात भरती झालेले घाटगे हे कष्टाळू व प्रामाणिक कर्मचारी होते. 29 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस झाला होता.त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे


दरम्यान, घाटगे यांच्या निधनाची माहिती समजताच शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. नरंदे गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a comment

0 Comments