वानवडी पोलिसांनी 29 लाखाचा गुटखा व प्रतिबंधात्मक पान मसाला पकडला. याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला .पुणे –
 वानवडी पोलिसांनी 29 लाखाचा गुटखा व प्रतिबंधात्मक पान मसाला पकडला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

गणपतसिंग राजपूत (रा.कोंढवा),रेवणनाथ निंबाळकर( हडपसर), हेमंत, निजाम, मिथून नवले(गणेश पेठ),प्रकाश परिहार(रा.कोंढवा) अशी आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून प्रतिबंधात्मक पान मसाला व वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

ही कारवाई भौरोबानाला ते लुल्लानगर चौकात शुक्रवारी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार राजू रासगे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी राज्यात गुटखा बंदी असतानासुध्दा तीची वाहतूक, साठवण आणी विक्री करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे करत आहेत.

Post a comment

0 Comments