शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत शुक्रवारी (19 फेब्रुवारी) बदल केला आहे



 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत शुक्रवारी (19 फेब्रुवारी) बदल केला आहे. सकाळी 5 वाजल्यापासून गर्दीसंपेपर्यंत लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर सर्व प्रकारच्या बसेस आणि वाहनांना वाहतुकीस वाहतूक शाखेने बंदी केली आहे.

लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्त्याहून मिरवणुका निघतात. त्यामुळे प्रामुख्याने बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आदी पेठ भागातील रहदारीमध्ये वाढ होऊन वाहतूक संथ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या भागांत वाहतूक सुरळीत सुरू राहण्याच्या अनुषंगाने वाहतुकीत बदल केले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍त राहुल श्रीरामे यांनी यासंदर्भात आदेश दिले.अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका वगळता आवश्‍यकतेनुसार आणि संबंधीत रस्त्यावरील वाहतुकीच्या परिस्थितीनुसार वाहतूक व्यवस्थेत शुक्रवारी सकाळी 5 वाजल्यापासून गर्दीसंपेपर्यंत लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर सर्व प्रकारच्या बसेस आणि वाहनांना वाहतुकीस बंदी केली असून त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

हे आहेत पर्यायी मार्ग

  • शिवाजी रस्त्याहून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक - टिळक चौक - टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
  • स.गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशीची राणे चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.
  • अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकातून बुधवार चौकाकडे आणि फुटका बुरुजकडे येणारी वाहतूक बंद करून वाहतूक केळकर रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
  • लक्ष्मी रस्त्यावरून जाणारी वाहतूक संत कबीर चौकातून बंद करून सर्व वाहने नेहरू रस्त्याने सेव्हन लव्ज चौकाकडे आणि उजवीकडे वळून पॉवर हाऊस चौकाकडून पुढे इच्छितस्थळी जातील.
  • बाजीराव रस्त्यावरून मनपाकडे जाणारी वाहतूक आवश्‍यकतेनुसार पुरम चौकातून टिळक रस्त्याने पुढे खंडोजीबाबा चौकातून इच्छितस्थळी जातील.
  • गणेश रस्त्यावरून फडके हौदाकडे येणारी वाहने ही देवजीबाबा चौकातून डावीकडे वळून पुढे हमजेखान चौकाकडे वळवून पुढे स्वारगेटकडे किंवा इच्छितस्थळी जातील.

Post a Comment

Previous Post Next Post