सांगलीत लॉक डाऊन नंतर पहिल्यांदाच बैल बाजार फुलला.सांगली:
 पहिल्यांदाच सांगलीत बैल बाजार भरला आहे. त्यामुळे बैल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली आहे. विशेष म्हणजे या बाजारात अत्यंत जातीवंत बैल विक्रीसाठी आले असून त्याला मोठी किंमतही लागली आहे. एका खिलार बैलाला इनोव्हा एवढी किंमत आल्याने सध्या खुरसुंडीचा खिल्लार जनावर बाजार चर्चेत आला आहे.

सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे भरणारी पौष यात्रा ही महाराष्ट्रामध्ये जातिवंत आणि नामवंत खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची खरेदी-विक्री होत नव्हती. मात्र आता सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने covid-19 ते सर्व नियम पाळून खरसुंडीतील बैलबाजार हा भरवण्यात आलेला आहे. बैल बाजार भरवण्यात आला असला तरी खरसुंडीमधील पौशी यात्रा कोरोनामुळे भरू शकली नाही. परंतु, लॉकडाऊननंतर भरणाऱ्या पहिल्याच बैल बाजाराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे खरसुंडीचा खिल्लार जनावर बाजारात सुमारे 6 ते 7 कोटींची उलाढाल झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

20 हजार जातीवंत खिलार बैलांची आवक

पौर्णिमेला शेळ्या मेंढ्यांच्या बाजाराने यात्रेला सुरूवात होते. यात्रेमध्ये यात्रेसाठी शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी घेऊन येत असतात आणि मोठ्या प्रमाणावर विविध राज्यातून व्यापारी येत असतात. यंदा यात्रा गावाच्या शेजारी न भरता खरसुंडीच्या दक्षिणेस गावाच्या बाहेर भरली आहे. मुबलक जागा असल्याने यात्रा मोठ्या प्रमाणावर भरली. लाखोरुपये किमतीच्या अनेक बैलांबरोबरच तब्बल 20 हजार जातिवंत खिलार बैलांची आवक यात्रेमध्ये झालेली आहे.

इनोव्हाच्या किंमती एवढा बैल

यात्रेमध्ये 16 लाख रुपये किमतीचा बैल आकर्षणाचा विषय ठरला आहे. या बैलाची किंमत इनोव्हा एवढी असल्याने हा बैल सध्या बाजारातील सर्वात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. यात्रेमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मार्केट कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने लाईट आणि पाण्याची सोय करण्यात आलेली आहे.

Post a comment

0 Comments