पुणे : धावपट्टीच्या दुरुस्तीकामासाठी पुणे विमानतळ 26 एप्रिल ते 9 मेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार
पुणे : धावपट्टीच्या दुरुस्तीकामासाठी पुणे विमानतळ 26 एप्रिल ते 9 मेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. या 14 दिवसांत एकही व्यावसायिक विमान लॅण्डिंग वा टेक ऑफ करणार नाही, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाने रविवारी दिली


लोहगाव येथील हवाई दलाच्या एअर बेसवरूनच व्यावसायिक विमानांची सेवा सुरू असते. सध्या रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत धावपट्टी दुरुस्तीचे काम चालू आहे. त्यामुळे रात्रीच्या 10 विमान सेवा दिवसाच्या वेळापत्रकात चालवण्यात येत आहेत. हवाई दलामार्फत गेल्या वर्षी 26 ऑक्टोबरपासून धावपट्टीचे दुरुस्तीकाम केले जात आहे. या कामाला गती देण्यासाठी एप्रिल-मे महिन्यात 14 दिवस विमान उड्डाणे पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत.

Post a comment

0 Comments