पुणे महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येत 45 ची भर पडली असून, ती आता 214 इतकी झाली आहेपुणे महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येत 45 ची भर पडली असून, ती आता 214 इतकी झाली आहे. या नव्या 45 `नगरसेवकांना` महापालिकेने अधिकृत ओळखपत्रही वाटले आहेत. त्यातील काही उत्साही नगरसेवकांनी 'सोशल मीडिया'तून ओळखपत्र व्हायरल केली आहेत. राज्य सरकारने किंवा निवडणूक आयोगाने ही संख्या वाढविण्याऐवजी भाजपच्या पालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनीच आपल्या पातळीवर ही कामगिरी केली आहे.

महापालिकेत अचानक एवढे नगरसेवक वाढण्याचे कारण आहे; क्षेत्रीय कार्यालयाच्या पातळीवर नेमलेल्या स्वीकृत सदस्यांनाही महापालिकेने नगरसेवकपदाचे ओळखपत्र देऊन सन्मान दिला आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यादांच अशा प्रकारे क्षेत्रीय कार्यालयामध्ये नेमलेल्या सदस्यांच्या हट्टापायी स्वीकृत सभासद असे ओळखपत्र देण्यात आले आहेत्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या गोटातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या सभागृहात निवडून आलेले 164 नगरसेवक आहेत. त्यात विविध राजकीय पक्षांच्या पाच स्वीकृत नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यात अधिकृत नगरसेवक हे 169 आहेत.क्षेत्रीय कार्यालयाच्या कामात लोकसहभाग  उद्देशाने क्षेत्रीय कार्यालयांतही स्वयंसेवी संस्थाच्या प्रतिनिधींची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना स्थान मिळत नाही. उलट राजकीय कार्यकर्त्यांची सोय यात लावले जाते. त्यानुसार 15 क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्येकी 3 अशा 45 सदस्यांची निवड केली आहे. अनेक हे स्वीकृत सदस्य कार्यक्रम पत्रिकेवर नाव लिहिताना किंवा स्वतःची ओळख सांगताना स्वीकृत नगरसेवक म्हणून खोटेपणाने मिरवतात. त्यांना अधिकृत दर्जा नसतानाही त्यांच्याच पातळीवर ते हा खोटेपणाचा उद्योग करत होते.

आतापर्यंत या सदस्यांना ओळखपत्र देण्यात आले नव्हते. परंतु, ते मिळावे, यासाठी सगळेच म्हणजे, 45 सदस्य आग्रही होते. मात्र, महापालिकेच्या कायद्यात तशी तरतूद नसल्याने ते देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली. तरीही, ओळखपत्र हा आपला हक्क असल्याचे सागत स्वीकृत सदस्य आपल्या मागणीवर ठाम राहिले. आपल्या मागणीवरून महापालिकेतील सत्ताधा्यांसह विरोधकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शेवटी प्रशासनाने सहायक आयुक्त दर्जाच्या म्हणजे त्या- त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सहीचे ओळखपत्र या सदस्यांना देण्यात आले. त्यामुळे हे खोटे नगरसेवक पद नसतानाही ते मिरवत आहेत.

पुणे महापालिकेत गेल्या काही दिवसापासून खऱ्या स्वीकृत सदस्यांना पदाचा मान मिळत आहे. खरे स्वीकृत नगरसेवक असलेल्या गणेश विडकर यांना सभागृहातील नेतेपद मिळाले. महापालिकेत प्रथम एखाद्या स्वीकृत नगरसेवकाला महत्त्वाचे पद मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले, मात्र, हे पद स्वीकृत सदस्याला मिळू नये, अशी कायद्यात कोणतीही अट नसल्याचे कारण देत, भारतीय जनता पक्षाने बिडकरांना संधी दिली. त्यापाठोपात क्षेत्रीय कार्यालयातील स्वीकृत सदस्यांनाही नगरसेवकपदाचे ओळखपत्र मिळाल्याने उलटसुलट चर्चा आहे. या खोटेपणावर महापौर, सभागृह नेेते हे आता उपाय करणार, याची उत्सुकता आहे.

Post a comment

0 Comments