कायमस्वरुपी वादग्रस्त राहणारे आणि ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून कारभार करणारे तांबे यांच्याकडून पाणीपुरवठा विभागाकडील कारभार काढून घेण्यात आला
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांना आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी चांगलाच दणका दिला आहे. कायमस्वरुपी वादग्रस्त राहणारे आणि ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून कारभार करणारे तांबे यांच्याकडून पाणीपुरवठा विभागाकडील कारभार काढून घेण्यात आला आहे. त्यांचे कामकाज कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्याकडे अतिरिक्‍त पदभार देवून सोपविला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचे वादग्रस्त सहशहर अभियंता रामदास तांबे यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी झटका दिला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागात तांबे कार्यरत होते.त्यांनी कोट्यवधी रुपयाची कामे काही ठेकेदारांना सोपविली असल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता. तसेच बिल्डरांना एनओसी प्रकरण, चोवीस तास अमृत योजना, भासा-आसखेड, आंद्रा प्रकल्प, पवना जलवाहिनी प्रकल्प याशिवाय पाणी पुरवठा देखभाल व पथचलन कामांमध्ये अनेक तक्रारी येवू लागल्या होत्या.या सोबतच मागील दीड वर्षापासून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत आहे. नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्याकडे सोयीस्कर तांबे यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र अमृत योजनेतून 24 तास पाणीपुरवठ्याची कामे देखील अजून, प्रलंबित आहेत. त्यामुळे तांबे यांच्याविषयी नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारी वाढल्या होत्या.

दरम्यान, तांबे यांच्याकडून पाणी पुरवठा विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे तांबे यांच्याकडे पर्यावरण आणि जलनि:स्सारण विभागाचे कामकाज दिले आहे. तर पाणी पुरवठा विभागाचा पूर्ण कारभार जलशुद्धीकरण सेक्‍टर 23 चे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांना बढती देत अतिरिक्त सहशहर अभियंता पदाचा कारभार सोपविला आहे. तसे आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

Post a comment

0 Comments