बाळासाहेबांमुळे बॉलिवूड सुरक्षित होतं..उर्मिला मातोंडकर.मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबईत मराठी माणूस ताठ मानेने जगू शकला असं नेहमीच सांगण्यात येते. तर महाराष्ट्राला प्रखर हिंदुत्व बाळासाहेबांनीच दिले असाही मतप्रवाह आहे. मात्र आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी बाळासाहेबांमुळे बॉलिवूड सुरक्षित होतं, असं म्हटले आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी उर्मिला यांनी येथे हजेरी लावली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

शिवसेनेचा भाग आहे म्हणून आज मी इथं आले आहे. मात्र बाळासाहेबांबाबत माझ्याबाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि स्वत: बाळासाहेब अजूनची आमच्यासोबतच आहेत', असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.यावेळी उर्मिला यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे कमी बालून अधिक कृतीवर भर देणारे आहेत. कोविड काळात मुख्यमंत्र्यांनी जो सयंम दाखवला तो कौतुकास्पद होता, असंही उर्मिला यांनी नमूद केले

Post a comment

0 Comments