केंद्र सरकारने प्रेक्षकांच्या क्षमतेवर लावण्यात आलेले निर्बंध हटवले आहेत. १ फेब्रुवारीपासून १०० टक्के चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांना प्रवेश 

नवी दिल्ली - अनलॉक प्रक्रियेअंतर्गत करोनामुळे लावण्यात आलेली बंधने हळू हळू कमी करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेने सुरु होती. पण आता केंद्र सरकारने प्रेक्षकांच्या क्षमतेवर लावण्यात आलेले निर्बंध हटवले आहेत. १ फेब्रुवारीपासून १०० टक्के चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांना प्रवेश परवानगी देण्यात आली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह १०० टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली असली तरीही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. याचे पालन चित्रपटगृह व्यवस्थापनाला करावे लागणार आहे.


असे असतील नियम

  • चित्रपटगृहामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीतकमी ६ फूट अंतर राखणे बंधनकारक असेल.

  • चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोडाला मास्क बंधनकारक आहे.

  • चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दोन्ही ठिकाणी सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.

  • चित्रपटगृहांच्या परिसरात थुंकण्यास कडक निषिद्ध

Post a comment

0 Comments