ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतलाराळेगणसिद्धी - देशभरातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवरून असंतोष आहे. दिल्लीत मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता अण्णांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषीराज्यमंत्री दोघांनी यासाठी प्रयत्न केले.

केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या निर्णयांना उशीर झाल्याचे मान्य केले. त्यावर केंद्र सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे मी नियोजित उपोषण मागे घेत तब्बल सात भेटी घेऊन चर्चा केल्यानंतर अण्णा हजारे यांना उपोषणाच्या निर्णयापासून परावृत्त करण्यात भाजपला यश आले आहे. यापूर्वी सहावेळा भाजपचे प्रयत्न फोल ठरले होते.

अण्णा यांनी आपले नियोजित उपोषण मागे घ्यावे यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सहावेळा अण्णांची भेट घेतली होती. मात्र अण्णा आपल्या उपोषणावर ठाम होते. येत्या ३० जानेवारीपासून अण्णांच्या आंदोलनाला सुरूवात होणार होती. 

Post a comment

0 Comments