आण्णा.....यह पब्लिक है पब्लिक और वह सब जानती है अंदर क्या है, बाहर क्या है....!



आदरणीय अण्णा हजारे,

आपणास कोणतं संबोधन वापरू याविषयी 

मी बुचकाळ्यात पडलो आहे. आपणास रामराम म्हणू की जय भीम ? जय हिंद म्हणू जय भारत ? आपण कोणे एकेकाळी सैन्यात होता त्यामुळे जय जवान म्हणालो असतो पण आपण नमोरूग्णासारखं अलिकडे किसानविषयक बिलांवर बडबड करत असल्याने शास्त्रीजींच्या किसानांचा जय जयकार आठवल्याने तो नारा घायाळ नाय करू शकत मी !  मी खरं तर एकेकाळी आपला फैन होतो. पाचपंचवीस वर्षांपूर्वी आपण राळेगणसिद्धीत उपोषणाला बसला होता. मी, डॉ. श्रीराम मसलेकर, डॉ. प्रफुल्ल पाटील, तत्कालिन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मोहन राठोड परभणीहून रातोरात राळेगणसिद्धीला पोहचलो होतो. कारण आत्मियताच तशी होती आपल्याविषयी. खरं तर त्यावेळी ना आम्हाला मीडियाचा गराडा दिसला ना झगमगाट. गावात सारं काही सामान्य होतं जसं काही घडलंच नाही !


पण पुढे आपलं एक एक उपोषण रंग दाखवत गेलं... जंतरमंतरवरील उपोषणानंतर तर आपणही स्वतःला मनोमन गांधी समजायला सुरुवात केली असल्याचे आपली देहबोली आणि आणि बोलण्यातून जाणवत गेलं !

दरम्यान पुलाखालून खूप पाणी गेलं...

आपले जमिनीवर आले आहेत असे असे वाटत असतानाच "मी पुन्हा येईनचा" कंठशोष करणा-या व्यक्तीसोबत आपण पत्रकारांसमोर आलात. पण एका पत्रकाराने ज्या पद्धतीने आपली बोलती बंद केली ते पाहून कीव वाटली आपली !

अण्णा, माफ करा. आपण तेवढे मोठे नाहीत, जेवढे आपण स्वत:ला समजता.

कुंभकर्ण झोपेतून उठायचं अन् महात्मा गांधी असल्यागत सल्ला द्यायचा हे ठीक नाही वाटत अण्णा. आपल्या वयाचा विचार करून कधीही नतमस्तकच होणार आम्ही. पण आम्हाला भक्त समजू नका !

जाता जाता एकच सांगतो... आपण अरविंद केजरीवाल यांच्या पासंगालाही पुरत नाहीत !

सामाजिक जीवनात वावरत असताना अनेक माणसं पाहिली, वाचली, अनुभवली पण आपली रंग-ढंगबदलू भूमिका आणि विधानं समोर आल्यानंतर एकच वाटतं... आपल्यासारखे आपणच आहात अण्णा ! तोड नाय आपणास !!पण आता जंतर मंतर डोक्यातून काढून टाका. पुन्हा एकदा सुरुवात करा राळेगण सिद्धीपासून !  वैसे तो नये सिरे से शुरुवात करने से पहले आपने धन्यवाद देना चाहिए मनूवादी मीडिया को जिसने तुम्हे खाक से उठाकर फलक पे बिठा दिया...! लेकिन एक बात हमें नहीं भुलने चाहिए के यह पब्लिक है और वह सब जानती है !


जय भीम !

जय संविधान !!

जय भारत !!!

*भीमप्रकाश गायकवाड*

रविराजपार्क, परभणी

Post a Comment

Previous Post Next Post