केंद्रीय अर्थमंत्रालयाची असहकार्याची भूमिका या सर्वाचा विरोध म्हणून कराडात कर सल्लागार संघटनेच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.




कराड : संपूर्ण देशातील 200 संघटनांनी पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जीएसटी कायद्यातील किचकट तरतुदी, प्रचंड विलंब शुल्क, वारंवार बंद पडणारी संगणक प्रणाली, करसल्लागार व करदात्यांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास, केंद्रीय अर्थमंत्रालयाची असहकार्याची भूमिका या सर्वाचा विरोध म्हणून कराडात कर सल्लागार संघटनेच्या वतीने मोर्चा काढून शांततेत आंदोलन करण्यात आले.

यावेळी करसल्लागार संघटनेच्यावतीने केंद्रीय जीएसटी कार्यालयात निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदिप तलाठी, उपाध्यक्ष विकास पाटील, खजिनदार समीर पाटील यांनी निवेदन दिले. जीएसटी अधिक्षक सचिन उपाध्ये यांनी निवेदन स्वीकारले.अध्यक्ष संदिप तलाठी यांनी या अंदोलनामागची भूमिका विशद केली व करदात्यांची या त्रासातून लवकरच सुटका व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ सदस्य दिपक पेंढारकर, के. एल. सावंत, शिरीष गोडबोले, सुनिल मुंद्रावळे, व्ही. एल. सावंत, संजय बुटाला, चंद्रकांत हावरे, राहूल कुलकर्णी, चंद्रशेखर ठोके आयुब संदे, राजेश कराडकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. आभार विकास पाटील यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post