इचलकरंजी : शहापूर येथे शाळेच्या मैदानावर धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून

इचलकरंजी  : शहापूर येथे शाळेच्या मैदानावर धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. शुभम दिपक कुडाळकर (रा. मंगळवार पेठ, वय २६) असे खून युवकाचे नाव असल्याचे समजते.गॅं.गवारमधून हा खून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. शहापूर भरवस्तीत हत्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी शहापूर पोलिस दाखल झाले आहेत.

मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास विशाल विद्यालयाच्या मैदानात जवळील मार्गावरून एक व्यक्ती आपल्या घरातील रुग्णाला जेवणाचा डबा देण्यासाठी जात होती. या व्यक्तीला गाडीच्या प्रकाशासमोर एक रक्तबंबाळ झालेला तरुण पडलेला दिसून आला.

Post a comment

0 Comments