AdSense code पुणेः नवले ब्रिजवर अपघात.

पुणेः नवले ब्रिजवर अपघात.

 भरघाव ट्रकने दिली सात ते आठ वाहनांना धडक, या अपघातात काहीं वाहनांचा अक्षरशा चुराडा .

नवले ब्रिजवर पुणे बंगलोर महामार्गावर हा अपघात झाला.


PRESS MEDIA LIVE :. पुणे : प्रतिनिधी :

पुणे - चालकाचं नियंत्रण सुटल्याने पुण्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना धडक दिली असून नवले ब्रीजवर पुणे-बंगळुरु महामार्गावर हा अपघात झाला. यामध्ये सहा ते सात जण जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रकने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ट्र्क साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने निघाला असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या व रस्त्याशेजारी उभ्या असणाऱ्या वाहनांना ट्रकने धडक दिली. या अपघातामुळे काही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही वेळासाठी वाहतूक पूर्णपणे थांबली होती. अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.

Post a comment

0 Comments