पिंपरी-चिंचवड महापालिकेचे

 

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना राज्य सरकार कडून बढती.


PRESS MEDIA LIVE : पुणे : प्रतिनिधी:

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना राज्य सरकारने बढती दिली असून त्यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य ) या पदावर करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी वाखाण्याजोगी कामगिरी केली आहे.एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना राज्य सरकारने बढती दिली असून त्यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य ) या पदावर करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी वाखाण्याजोगी कामगिरी केली आहे.अप्पर जिल्हाधिकारी (गट-अ) संवर्गातील संतोष पाटील हे 29 सप्टेंबर 2018 रोजी पिंपरी महापालिकेत अतिरिक्त अप्पर जिल्हाधिकारी (गट-अ) संवर्गातील संतोष पाटील हे 29 सप्टेंबर 2018 रोजी पिंपरी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी रुजू झाले. पदी रुजू झाले.या दोन वर्षांच्या काळात त्यांनी स्थापत्य, वैद्यकीय, भांडार, उद्यान, क्षेत्रीय कार्यालय आदींचा कार्यभार सांभाळला. मितभाषी असलेल्या पाटील यांनी कोणत्याही वादात न पडता सर्वसमावेशक कामगिरी केली. कोरोना महामारीत आरोग्य, वैद्यकीय विभागाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

राज्य सरकारने पाटील यांना अप्पर जिल्हाधिकारी निवड श्रेणी (गट-अ) या संवर्गात बढती दिली आहे. तसेच त्यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दोन वर्षांच्या कामगिरीबाबत आपण समाधानी असल्याचे ते म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post