अभिनेता अर्जुन रामपाल

 अभिनेता अर्जुन रामपालची पुन्हा  NC B कडून आज कसून चौकशी होणार.PRESS MEDIA LIVE :

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्‍शनमध्ये बॉलिवूडमधील अनेक नावे समोर येत आहेत. नारकोटिक्‍स कंट्रोल ब्यूरोकडून याप्रकरण कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल याची आज चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत एनसीबीने अर्जुनला समन्स बजावण्यात आला आहे. याआधी 13 नोव्हेंबर रोजी अर्जुनची एनसीबीकडून तब्बल सात तास चौकशी करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी एनसीबीने बुधवारी अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्‌स हिची देखील चौकशी केली. त्यानंतर आता अर्जुनला देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

Post a comment

0 Comments