पदवीधर व शिक्षक निवडणूक.


 व्यापक व सर्वसमावेशक शैक्षणिक धोरण’ देण्यासाठी

  महाविकास आघाडीचे ऊमेदवार निवडून द्या : गोपाळ तिवारी.                                                                           सोळाव्या शतकाचे नको,एकविसाव्या शतकाचे शैक्षणिक धोरण हवे ':गोपाळ तिवारी 


PRESS MEDIA LIVE : पुणे :

२१व्या शतकात देशाला जात-वर्णांवर आधारीत नव्हे तर विवेकानंदाना अपेक्षीत विश्वबंधूत्वाचे नाते जपणारे, विज्ञानधिष्ठीत, व्यापक व सर्वसमावेशक शैक्षणिक धोरण देण्यासाठी महाविकास आघाडीचेच ऊमेदवारांची निवड करावी,'असे आवाहन  पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रचार सांगता प्रसंगी  कॅाग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.

रविवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हे आवाहन केले.

  विधान परीषदेत ‘संविधानात्म राष्ट्रभावनेला समर्पित’, दुरदृष्टीच्या विचारींची धोरणे आखण्यार्या पक्षांच्या प्रतिनिधींची तेथे गरज आहे, त्या मुळे देशास १६ व्या शतकाकडे मागे नेणाऱ्या धोरणांचे समर्थन करणाऱ्या भाजप ऊमेदवारांना रोखणे हीच देशाची गरज आहे. म्हणूनच महाविकास आघाडी च्या ऊमेदवारांना निवडून देणे हे आज देश व समाजा पोटी कर्तव्य ठरेल, असे आवाहन ही गोपाळ तिवारी यांनी प्रचार समारोप समयी केले.  

  सरसंघचालक  मोहन भागवत यांनी राममंदीर भूमिपूजन प्रसंगी केलेल्या भाषणातून जे सूर उमटतात तेच भाजप च्या केंद्रीय नेतृत्वाने आणलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात’ दिसून येतात. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील शैक्षणीक प्रगती व साक्षरता लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षाही किंचीत अधिकच असल्यामुळे, देशातील कोट्यावधी विद्वतेचा प्राप्त तरूण परदेशात जाऊन विविध आघाड्यांवर प्रगतीपथावर आहेत व हे आजपर्यंत देशांतर्गत राबवलेल्या शैक्षणिक धोरणे, शिक्षणाच्या संधी व ऊपलब्धते मुळेच शक्य झाले आहे मात्र त्या धोरणास छेद देऊन देशास १६ व्या शतकाकडे नेणारे जाती-धर्म व वर्ण आधारीत व ‘आहेरे वर्गाचे’ हित जपणारे शैक्षणिक धोरण भाजप देशांतर्गत लागू करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप  गोपाळ तिवारी यांनी या पत्रकात केला आहे.                                                                                                                                                                             

Post a Comment

Previous Post Next Post