पण रुग्णांमध्ये अद्याप भीती कायम.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणेस परवानगी, पण रुग्णांमध्ये अद्याप भीती कायम.

PRESS MEDIA LIVE :. मोहम्मद जावेद मौला : 

पुणे - करोनामुळे देशातील सर्व शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या. त्यामध्ये मोतीबिंदूच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया वेळेत न झाल्यामुळे अनेक अडचणी समोर आल्या आहेत. पुणे शहरात जवळपास 40 टक्के रुग्णांच्या शस्त्रक्रिया लॉकडाउन काळात पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली. आता या शस्त्रक्रिया सुरू झाल्या असल्या, तरी रुग्णांमध्ये करोनाची भीती आहे. त्यामुळे ते शस्त्रक्रियेला लवकर तयार होत नसल्याचे निरीक्षण नेत्रतज्ज्ञांनी नोंदवले आहे.

महाराष्ट्र नेत्रचिकित्सा संस्थेने आयोजित पहिल्या ऑनलाइन परिषदेत याबाबत चर्चा करण्यात आली. परिषदेत पाच हजारांहून अधिक नेत्रतज्ज्ञ सहभागी झाले होते. मोतीबिंदू हे भारतातील अंधत्वाचे प्रमुख मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेस उशीर केल्यामुळे गुंतागुंत होऊन अंधत्व येते. करोना काळात देशभरात 50 हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रियांना उशीर झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दृष्टीहिन प्रमाण वाढण्याची भीती असून, त्याबाबत नेत्रतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. तसेच मोतीबिंदू काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांस उशीर करू नये, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.



'काचबिंदू किंवा मधुमेह रेटिनोपॅथीसारख्या डोळ्यांशी संबंधित इतर आजार असलेल्या रुग्णांनीही डोळ्यांच्या नियमित चाचण्या केल्या पाहिजेत. करोनाच्या भीतीमुळे डोळ्यांची तपासणी करण्यास उशीर करू नये तसेच मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया थांबवू नये,' असा सल्ला एशियन आय इन्स्टिट्यूट ऍन्ड लेझर सेंटर, नेत्र तज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांनी दिला.

नेत्रतज्ज्ञ डॉ. गणेश म्हणाले, 'बहुतेक रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रियेस सहा महिन्यांपेक्षा उशीर झाला आहे. त्यामध्ये अनेक प्रौढ किंवा अति-प्रौढ मोतीबिंदू घेऊन येत आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया अधिक कठीण होऊन गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. जेव्हा मोतीबिंदू अधिक परिपक्व होतो तेव्हा यामुळे लेन्स प्रेरित ग्लूकोमा आणि अपरिवर्तनीय अंधत्व येते.'

करोनामुळे लॉकडाउन होते. त्यामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रियांना उशीर झाला आहे. पुण्यात सुमारे 30 ते 40 टक्के मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता त्यातील 70 टक्के शस्त्रक्रिया हळूहळू होत आहेत. लॉकडाउनमध्ये शस्त्रक्रियांना परवानगी नव्हती. आता परवानगी मिळाली असली तरी रुग्णांमध्ये अद्याप भीती कायम आहे.

- डॉ. माधव भट, नेत्रतज्ज्ञ आहे.

Post a Comment

Previous Post Next Post