पेन्शन धारकांसाठी दिलासादायक बातमी.


पेन्शन धारकांसाठी दिलासादायक बातमी.



PRESS MEDIA LIVE :

नवी दिल्ली - जर तुम्ही पेन्शनधारक असाल आणि तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर केलेले नसेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 67 लाख पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे अनेक पर्याय दिले आहेत. आता तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आणि जवळच्या बँकेत देखील जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता.

कर्मचारी निवृत्तीवेतन योजना 1999 च्या सर्व निवृत्तीवेतनधारकांना निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी त्यांचे जीवन प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये सादर करावे लागते. मात्र, यावेळी सरकारने तारीख वाढवून 31 डिसेंबर केली आहे. जीवन प्रमाणपत्र हे पेंशनधारकाच्या जर हे प्रमाणपत्र जमा केले नाही तर पेन्शन मिळणे बंद होते.

बँक आणि टपाल कार्यालयात जमा करा जीवन प्रमाणपत्र -

ईपीएफओच्या 135 क्षेत्रीय कार्यालये आणि 117 जिल्हा कार्यालयाव्यतिरिक्त, ईपीएस निवृत्तीवेतनधारक आता त्या बँकेत व जवळच्या टपाल कार्यालयांमध्ये डीएलसी जमा करू शकतात जिथून त्यांना पेन्शन मिळते.

सीएससीमध्ये सबमिट करू शकता -

या व्यतिरिक्त कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) च्या 3.65 लाखाहून अधिक देशव्यापी नेटवर्कवरही डीएलसी जमा करता येईल. याशिवाय ईपीएस पेन्शनधारक 'उमंग' अ‍ॅपचा वापर करुन देखील डीएलसी सबमिट करू शकतात.

घरी बसून जमा करू शकता जीवन प्रमाणपत्र -

काही दिवसांपूर्वी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) ने निवृत्तीवेतनधारकांसाठी घरातूनच डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (डीएलसी) सादर करण्याची सुविधा सुरू केली आहे. ईपीएस पेन्शनधारक आता नाममात्र फी भरून घरबसल्या त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज करू शकतात. आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधील एक पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी येऊन डीएलसी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.

वर्षभरात कोणत्याही वेळी जमा करा डीएलसी -

नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ईपीएस पेन्शनधारक आता त्यांच्या सोयीनुसार वर्षाच्या कोणत्याही वेळी डीएलसी सबमिट करू शकतात. डीएलसी जमा केलेल्या तारखेपासून एक वर्षापर्यंत जीवन प्रमाणपत्र मान्य राहिल. ज्या पेन्शनधारकांना 2020 मध्ये पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) जारी केलेले आहे, त्यांना एक वर्ष पूर्ण होईपर्यंत जेपीपी अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

उमंग अॅप वर जीवन प्रमाणपत्र कसे तयार करावे-

- गूगल प्लेस्टोअर वरून उमंग अॅप डाऊनलोड करा. अ‍ॅप उघडल्यावर त्यात लाइफ प्रूफ सेवेचा शोध घ्या. यानंतर, तुमच्या मोबाईलवरून बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट करा.

- जीवन प्रमाण सर्व्हिसमध्ये देण्यात आलेल्या जनरल लाइफ सर्टिफिकेटच्या टॅबवर क्लिक करा.

- येथे आपला आधार नंबर आणि मोबाइल नंबर निवृत्तीवेतन प्रमाणीकरण टॅबमध्ये दिसून येतील. जर दोन्ही गोष्टी ठीक असतील तर जनरेट ओटीपी बटणावर क्लिक करा.

- तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर भरा आणि सबमिट करा. यानंतर, आपल्या बायोमेट्रिक डिव्हाइसच्या मदतीने आपले फिंगरप्रिंट स्कॅन करा.

- फिंगरप्रिंट मिळताच डिजिटल लाइफ प्रमाणपत्र तयार होईल.

- प्रमाणपत्र पाहण्यासाठी व्ह्यू प्रमाणपत्र वर क्लिक करा.

- आधार नंबरच्या मदतीने पाहू शकता.

67 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळेल -

सरकारने देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूपासून ज्येष्ठ नागरिकांना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या उपक्रमाचा सुमारे 67 लाख ईपीएस निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल. पुरावा असतो.

Post a Comment

Previous Post Next Post