सिंधुदुर्ग नगरी.

 जिल्हा परिषद सत्ताधारी हेतुपुरस्सर कामे वगळत असल्याचा शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांचा आरोप


PRESS MEDIA LIVE : 

सिंधुदुर्गनगरी | प्रसाद पाताडे


         जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० शाळा दुरुस्ती योजनेअंतर्गत अत्यावश्यक शाळा दुरुस्तींची कामे वगळून जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतील आणि तर राजकीय स्वार्थ बघून शाळांची यादी मंजूर केली असल्याचा आरोप शिवसेना जीप सदस्य गटनेते नागेंद्र परब यांनी केला आहे. तसेच जिप सत्ताधाऱ्यांनी ५ तालुक्यातील अत्यावश्यक दुरूस्तीची कामे वगळून संबंधित गावातील नागरिक आणि तेथील विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. याबाबत आज नागेंद्र परब यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांची भेट घेत लक्ष वेधले आहे. तसेच अत्यावश्यक दुरूस्ती आवश्यक असणाऱ्या शाळांचा यादीत समावेश करण्याची मागणी केली आहे. 

           सिंधुदुर्ग जिल्हयांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या ईमारतींची झालेली दुरावस्था व त्यामुळे विदयार्थ्यांची होणारी गैरसोय आम्ही सर्व शिवसेना पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी वेळोवेळी तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मांडून व त्या सर्व ईमारतींची दुरुस्ती होण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्यामुळे तत्कालीन पालकमंत्र्यांनी प्राथमिक शिक्षणाधकारी यांच्याकडून सदर शाळा ईमारतींचा सर्व्हे करुन दुरुस्ती आवश्यक असलेल्या शाळा ईमारतींची यादी मागून घेतली व त्यास आवश्यक असलेला सर्वचा सर्व निधी म्हणजेच रुपये ८ कोटी एवढा भरीव निधी जिल्हा वार्षिक नियोजन मधून मंजूर केला. 

       जीप सत्ताधाऱ्यांनी मंजूर केलेल्या यादीचा विचार केला असता सदर यादीतील कामे वगळून जिल्हा परिषद सत्ताधारांनी आपल्या मर्जीतील व राजकीय स्वार्थ बुद्धीने प्रेरीत होवून शाळा दुरुस्ती कामांची यादी मंजूर केलेली आहे. तसेच सदरच्या यादीमध्ये कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ व सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील तब्बल ४६ शाळा दुरुस्ती ची कामे हेतू पुरस्कर वगळलेली आहेत. त्यामुळे खरोखरच ज्या शाळा ईमारतींची दुरुस्ती तातडीने आवश्यक आहे. अशा शाळांवर व ज्या गावामध्ये सदर शाळा आहेत त्या गावागावात तसेच शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांवर अन्याय होत आहे. 

 याकडे जिप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधत जिल्हयांतील ज्या शाळांची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे. अशा शाळा ईमारतींना प्राधान्य देवून त्या कामांचा मंजूर यादीमध्ये समावेश करावा अशी मागणी जीप सदस्य नागेंद्र परब यांनी केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post