भारतीय आदिवासी जमाती निर्मित कला कुसुरीच्या वस्तू पुण्यात ट्राईब छत्री मध्ये प्रदर्शन.


भारतीय आदिवासी जमाती निर्मित कलाकुसरीच्या वस्तू  पुण्यात' ट्राईब छत्री' मध्ये प्रदर्शन

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापासून आदिवासी कलावस्तू पुणेकरांच्या भेटीस 

PRESS MEDIA :  पुणे :

भारतीय आदिवासी जमाती मधील कलाकारांनी निर्मित केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन   पुण्यातट्राईब छत्री' या कलादालनात   ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापासून भरविण्यात आले आहे. कोरोना साथीच्या काळात  काही दिवस बंद असलेले हे कलादालन नव्या दमाने आदिवासींच्या कलावस्तू पुणेकरांच्या भेटीस घेऊन आले आहे. आदिवासी जीवन शैली आणि ' बालमुद्रा ' या विषयातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे आणि सौ पूर्वा परांजपे हे भारतीय आदिवासी जमाती निर्मित कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात 'ट्राईब छत्री' नावाने कलादालन वर्षांपूर्वी सुरू केले आहे . केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या 'ट्रायबल को ओपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया'(ट्रायफेड) मान्यता प्राप्त हे राज्यातील एकमेव दालन आहे.

 पुणे महिला मंडळ, पहिला मजला, पर्वती मुख्य चौक ( पर्वती पायथा चौक ) येथे ९ ऑगस्ट पासून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात हे दालन आणि प्रदर्शन पाहता येणार आहे .येथे या वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन आणि विक्री व्यवस्था असेल .कपडे,किचन मधील वस्तू,कलाकुसर आणि शोभेच्या वस्तू,शिल्पे,चित्रे ,भेट वस्तू यांचा या प्रदर्शन केंद्रात समावेश असणार आहे.

देशाच्या २२ राज्यातील ४३० हून अधिक  आदिवासीं कलाकारांकडून या वस्तू मागविल्या आहेत आणि उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात सावरा, प्रधान,कोरकू, माडिया, गोंड, नागा, डोंगरिया कोंढ, भुतडा अशा अनेक आदिवासींच्या कलावस्तू आहेत . 


देशातील आदिवासींच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना उपजीविकेचे साधन मिळावे या हेतूने सुरु असणाऱ्या केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली आहे. पुण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची पर्वती ला भेट देण्याची सवय लक्षात घेता पर्वती पायथा येथील महिला मंडळाच्या जागेत हे केंद्र सुरु करण्यात आले असून त्याची सजावट आदिवासींमधील वारली, गोंड चित्रकारांनीच केली आहे.                                                         

Post a Comment

Previous Post Next Post