पुण्यातील खासगी रुग्णालयांकडून कोरोना

  पुण्यातील खासगी रुग्णालयांकडून कोरोना बाधितांची लुबाडणूक करीत असल्याची धक्कादायक बाब उघड.


PRESS MEDIA LIVE :  पुणे : ( प्रतिनिधी) 

पुणे : पुणे अणि पिंपरी-चिंचवड शहरात खासगी रुग्णालये करोना बाधितांची लुबाडणूक करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. वाढीव वैद्यकीय बिले तपासण्याची मोहीम सुरू केल्यानंतर मागील दहा दिवसांत 132 बिलांच्या तक्रारी आल्या. त्यातील 95 बिलांमध्ये वाढीव रक्कम खासगी रुग्णालयांनी वसूल केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबधितांच्या तब्बल 73 लाख 56 हजार रुपयांची बचत झाली आहे.

करोनाच्या सध्यस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

करोना बाधितांकडून अवाजवी बिले आकारण्याच्या गैरप्रकारला आळा बसण्यासाठी खासगी हॉस्पिटल्सनी दिलेल्या दीड लाख रुपयांवरील रकमेच्या बिलांची पूर्वतपासणी करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला. त्यासाठी शहरातील 30 हॉस्पिटलच्या बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहे. दीड लाखांपेक्षा अधिकचे बिल लेखापरीक्षण पथकाला दिले जाणार जाते. त्यांची तपासणी केल्यानंतर जादा दर आकारण्यात आले असतील, तर त्याबाबतचे म्हणणे रुग्णालयांकडून मागविले जाते. आकारलेले बिल योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर ते बिल रुग्णांना अथवा नातेवाईकांना दिले जाते. यामध्ये ही बाब समोर आली.

याविषयी राव म्हणाले, “पुण्यात खासगी हॉस्पिटल्सनी जादा बिले आकारल्याच्या 102 तक्रारी आल्या. या सर्व बिलांची तपासणी केली असता 65 बिलांमध्ये वाढीव बिले आकारल्याचे निष्पन्न झाले. 65 बिलांची एकूण रक्कम ही 2 कोटी 15 लाख रुपये होती. यामधून 30 लाख 94 हजार रुपये कमी करण्यात आले. तर पिंपरी-चिंचवड शहरातून 30 बिलांच्या तक्रारी आल्या होत्या. यामध्ये 51 लाख 84 रुपयांचे एकूण बिले होती. यातून 42 लाख 62 हजार रुपये कमी केले. यामुळे दोन्ही शहरात मिळून 73 लाख 56 हजार रुपयांची बचत झाली आहे. ‘

Post a comment

0 Comments