पुणे. परिचारिकांचा सवाल ; कोव्हिड ड्युटी नियमावरून

 परिचारिकांचा सवाल; कोविड ड्युटी नियमावरून रुग्णालयाबाहेर आंदोलन




PRESS MEDIA LIVE :. पुणे : (मोहम्मद जावेद मौला.)


पुणे - कोविड वॉर्डमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांना सात दिवस ड्युटी आणि सात दिवस क्वारंटाइन, अशी नेमणूक केली जात होती. मात्र, बाधितांची वाढती संख्या आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे परिचारकांच्या ड्युटीमध्ये वाढ करण्यात आली. एवढेच नव्हे तर मनुष्यबळाची अडचण सांगत शासनाच्या नवीन आदेशानुसार परिचारकांना सात दिवस डयुटी आणि सुटीचे दिवस पकडून केवळ तीन दिवस क्वारंटाइन. त्यामुळे परिचारकांना किती राबवून घेणार, रिक्त पदे का भरली जात नाहीत, परिचारिकांच्या कुटुंबाचे जीव धोक्‍यात का घालता? असे प्रश्‍न उपस्थित करीत ससून रुग्णालयातील परिचारिकांनी निषेध नोंदवला.महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील विविध रुग्णालयात कोविड रुग्णांचे संपर्कात राहून जीवाची पर्वा न करता अहोरात्र परिचारिका (नर्स) काम करत आहे. परंतु, रुग्ण सेवेसाठी त्यांना संरक्षक दर्जेदार साहित्य, सुविधा मिळत नाही. रुग्णसेवा देताना नर्स 65 टक्के कामाचा वाटा उचलतात. राज्यात 500 पेक्षा अधिक नर्स करोनाग्रस्त झाल्या असून तीन नर्सेसचा मृत्यू झाला आहे. परंतु, मनुष्यबळ तुटवडा सांगून कामाचा ताण असल्याने परिचारिकांना सुट्ट्या न घेता क्वॉरंटाइन न होता काम करावे लागत आहे.

प्रशासनाला केवळ सेवा करून पाहिजे, मात्र त्यासाठी लागणारे पीपीई किट, एन-95 मास्क, ग्लोव्हज्‌ आदी दर्जेदार साहित्य मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नर्सची रिक्त पदे भरण्यात यावी, राज्यात सुमारे सहा हजार रिक्त पदे असून ती तत्काळ भरावी. ती भरताना बंधपात्रित व कॉन्ट्रक्‍ट परिचारिकांची पदे भरून त्यांना शासकीय सेवेत समावून घ्यावे. कॉन्ट्रक्‍ट परिचारिका भरताना त्या शासनाने भराव्यात. सात दिवस डयुटी व सात दिवस क्वारंटाइन नर्सला करण्यात यावे.

संरक्षक साहित्य उपलब्ध व्हावे, रुग्णांच्या संर्पकात आलेल्या परिचरिकांचे स्वॅब घेऊन तपासणी करावी, बाधित झालेल्या परिचारिकेला व तिच्या कुटुंबाला 20 टक्के जागा राखीव असाव्यात. केंद्र सरकारने 50 लाखांचे विमा कवच मिळावे, बाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्सला 200 रुपये दैनंदित भत्ता मिळावा, बाधित व संशयित रुग्णांची सेवा करताना त्यांच्यासाठी शासनाने समिती गठण करुन अडीअडीचण सोडव्यात या आमचे मागण्या असल्याचे फेडरेशनचे अध्यक्षा सुमन टिळेकर यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post