परंपरा राखत

 

परंपरा राखत गौरायांचे आगमन 

PRESS MEDIA LIVE : पुणे :

कोरोनामुळे यावेळच्या गणेशोत्सवाचा उत्साह काहीसा कमी झाला असला तरी परंपरा राखत आणि जमेल तितकी काळजी घेत घरोघरी  महिलांनी गौरीचे थाटात आवाहन,आगमन  साजरे केले.   

देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई..असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.अशी अख्यायिका सांगितली जाते..ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फुलोरा आणि फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. राज्यासह देशातुन हद्दपार होऊ दे आणि सर्वांना निरोगी आयुष्य मिळो अशी प्रार्थना महिलांनी गौरीकडे केली.

-------------------------------------------                                                                photo : सदाशिव पेठेतील गौरी भावे -बीडकर यांच्या घरचा गौराया आवाहन सोहळा

Post a Comment

Previous Post Next Post