ई- छावणी प्रकल्प लांबणीवर,

 ई-छावणी प्रकल्प लांबणीवर, नागरिकांना ऑनलाईन सेवा मिळेनात.


PRESS MEDIA LIVE : पुणे : प्रतिनिधी : 

पुणे- कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामकाजातील समन्वय वाढविण्यासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे ऑगस्टपासून ई-छावणी प्रकल्प कार्यान्वित केला जाणार होता. मात्र, अद्यापही त्याला मुहूर्त मिळालेला नाही. हा प्रकल्प लांबणीवर पडल्याचे बोर्ड प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागातर्फे भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या (बीईएल) सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर ई-छावणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासह दिल्ली, सिकंदराबाद, आग्रा आणि लखनौ या पाच कॅन्टोन्मेंट बोर्डांची निवड झाली आहे.

कॅन्टोन्मेंटवासियांना विविध नागरी सेवा ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करून देणे आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातील नागरिकांची गर्दी कमी करणे, हा पोर्टल सुरू करण्यामागचा उद्देश आहे. हा प्रकल्प 1 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची घोषणा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने केली होती. मात्र, त्याची अद्याप चाचणी सुरू होणार असल्याने आता सप्टेंबरपासून हा प्रकल्प सुरू होणार असल्याचे बोर्डातील सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात केवळ व्यापार परवाने ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करून दिले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मिळकत कर, बांधकाम परवाने, नळ जोडणी, मालमत्तेचे हस्तांतर आदी सुविधाही ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत, असे बोर्ड प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post