पिंपरी चिंचवड शहर पुन्हा रेड झोन मध्ये

 पिंपरी-चिंचवड शहर पुन्हा रेडझोनमध्ये.

रूग्णसंख्या वाढत असल्याचा परिणाम
 


PRESS MEDIA LIVE :   पिंपरी :

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहराचा समावेश रेड झोनमध्ये झाला आहे. याबाबत अद्याप शासन आदेश आला नाही. सध्यातरी नियमांमध्ये काहीही बदल होणार नाही. मात्र एखाद्या आस्थापनेमध्ये जास्त रुग्ण सापडले तर ती कंपनी अथवा कार्यालय बंद करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

शहरामध्ये मार्च महिन्यामध्ये करोनाचे रुग्ण सापडले. त्या 12 रुग्णांनंतर शहरातील परिस्थिती करोनामुक्त झाल्यासारखी होती. मात्र त्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा करोनाचे रुग्ण आडळले. त्यामुळे शहराला रेडझोन म्हणून घोषित करण्यात आले. मे महिन्यामध्ये तुलनेने रुग्णवाढीचा दर कमी झाला. त्यामुळे राज्यशासनाने शहर 22 मे रोजी रेडझोनमधून वगळले. मात्र जून व जुलै महिन्यामध्ये सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे.लै  महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरातील रुग्णसंख्या दररोज हजारच्या पटीमध्ये वाढत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांत दररोजची रुग्णसंख्या कमी झाली होती. मात्र त्यामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. आजपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 27 हजार 78 इतकी झाली आहे. तर शहरातील 460 व शहराबाहेरील 106 अशा 546 जणांचा मृत्यू झाला आहे.  सततच्याढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य शासनाने पिंपरी चिंचवड शहराचा समावेश पुन्हा रेडझोनमध्ये केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती आज आयुक्त हर्डीकर यांना दिली. त्यामुळे शहर आता पुन्हा रेडझोनमध्ये असणार आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहराचा समावेश रेड झोनमध्ये झाला आहे. आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे सुरु केले आहेत. त्यामुळे शहर पुन्हा रेड झोनमध्ये जाणे ही बाब आपल्यासाठी चांगली नाही. शहराच्या काही कंपन्यांमध्ये आपल्याला रुग्ण सापडले होते. त्यासाठी आपण कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवले. कंपन्यामधील कामगारांच्या ऍन्टीजेन किटद्वारे तपासण्या केल्या आहेत.

जास्त रुग्ण आढळल्यास आस्थापन बंद होणार

शहराचा समावेश रेड नमध्ये झाला असला तरी नियमांमध्ये फारसे बदल केले जाणार नाही. एखाद्या कंपनीत किंवा कार्यालयात जास्त कर्मचारी बाधित आढळले तर ती कंपनी बंद केली जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याचे काम सुरु आहे. नागरिकांनी करोनाच्या लढाईमध्ये साथ देत नियम पाळायचे आहे. बाहेर जाताना मास्क परिधान करायचा आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments