क्रांतिसिंह नाना पाटील यांची १२० जयंती साजरी.

क्रांतिसिंह नाना पाटील यांची १२० वी जयंती साजरी.  

PRESS MEDIA LIVE. :

क्रांतिसिंह नाना पाटील म्हटले की सातारा जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध प्रतिसरकारचा धगधगता इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. प्रतिसरकार हे  " पञी सरकार "  या नावाने ही प्रसिद्ध आहे. नाना पाटील हे या प्रतिसरकारचे अनभिषिक्त राजेच होते. त्यांना महाराज म्हणूनही संबोधले जाई. त्यांच्या भिमकाय शरीराप्रमाणे त्यांचे मनही मोठे होते. पुष्कळ नेते असतात पण जनतेच्या अंतःकरणात अढळ स्थान मिळवणारे फारच थोडे असतात. त्यासाठी पराक्रमाबरोबर जनतेबद्दल आत्मीयता व प्रेम असावे लागते. छञपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्याप्रमाणे नाना पाटलांच्या ठिकाणी हे दोन्ही गुण असल्यामुळे एवढया मोठया क्रांतिकारी चळवळीचे आणि प्रतिसरकारचे ते नेते नव्हे तर लोकनेते झाले. 

प्रतिसरकारला स्त्रीयांचाही मोठा पाठिंबा होता. प्रतिसरकारच्या तुफान सैनिकांबरोबर स्त्री - सैनिकाही खांद्यावर बंदुका घेऊन कार्यात सहभागी झाल्या होत्या. या स्त्री - तुफान सैनिकांचे नेतृत्व लिलाताई पाटील करत होत्या. 

नाना पाटलांच्या सभांना स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात जमत. नाना सांगत , "  स्त्रियांनी स्वत : च्या मुक्ततेसाठी लढले पाहिजे." नाना पाटलांची भाषाशैली तसेच कथा - पुराणातील अनेक उदाहरणे देत विषय समजावून सांगण्याची त्यांची पध्दती, सुरक्षितता यातूनच येणारी निर्भयता यामुळेच गाम्रीण भागातील स्त्री प्रतिसरकारच्या चळवळीत सामील झाली. कामगार आणि गृहिणी या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना शेतकरी महिलांना किती काबाडकष्ट करावे लागतात याचे फार सुंदर वर्णन कॉ . नाना पाटील यांच्या भाषणात असे. स्त्रियांनीही पुरुषांच्या बरोबरीने वर्गीयलढ्यात सामील झाले पाहिजे आणि स्वत : च्या मुक्ततेसाठी लढले पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. यामुळेच येथील भूमीपुञांच्या माता -  भगिणी - लेकीबाळींनी आपल्या दैनंदिन जीवनात शिवशाहूं प्रमाणेच कवनामध्ये नाना पाटलांना स्थान दिले आहे. ४२ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात या भागातील स्त्रियांच्या नित्यांच्या ओव्यांमधील एक ओवी - 

" गांधी माझा सखा गं । ओवी त्याला गाईन । 
तुरुंगात जाऊन मी । स्वराज्य मिळवीन ।।१ ।। 
जवाहर माझा बंधु गं । ओवी त्याला गाऊया ।। 
उठा उठा , पती राजा । स्वराज्य मिळवू या ।।२ ।।
सुभाष माझा सखा गं । ओवी त्याला गाईन । 
राखी त्याला बांधुनी । वनवासी होईन ।।३ ।। 
*नाना माझा भाऊ गं । ओवी त्याला गाऊया ।*
*त्याच्या संगे लढता लढता । स्वराज्य मिळवू या ।।४ ।।*

यावरून क्रांतिसिंह नाना पाटलांचे जनसामान्यात किती महत्त्वाचे स्थान होते हे अधोरेखीत होते.

टीप :  छायाचिञ : 
शैर्य , धैर्य , कणखर , निर्भीड , *क्रांतिकारी पितापुञी :* क्रांतीविरांगणा  हौसाक्का पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील 

डॉ. देविका पाटील 
३ अॉगस्ट २०२०
कोल्हापूर

Post a Comment

Previous Post Next Post