कोंढवा. आता उपचार थांबवा...


 

कोरोना :  आता उपचार थांबवा असे म्हणण्याची वेळ  कोरोना  बाधितांच्या नातेवाईकांवर आली आहे.


PRESS MEDIA LIVE :. कोंढवा पुणे : ( प्रतिनिधी ) :

करोना आजारावर उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल होणे म्हणजे कर्जबाजारी होऊन बाहेर येणे. रुग्ण मृत्यूशय्येवर असल्यामुळे त्याला किती औषधे दिली जातात याचे मोजमाप येथे नसते. करोना वॉर्ड असल्यामुळे तेथे नातेवाईक किंवा इतर कोणालाही प्रवेश नसतो. फक्त पैसे भरा, औषधे आणा…, असाच डॉक्टर कर्मचाऱ्यांचा धोशा असतो. आपलं माणूस जगावं, यासाठी नातेवाईकही जमेल तसं पैसे जमा करून त्याचा भरणा करतात. यातूनच करोना उपचारात जीवाची किंमत वाढत चालली आहे.

करोनाच्या नावाने गेल्या पाच महिन्यांपासून खासगी रुग्णालयांकडून सर्वसामान्यांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी शासननिर्देशानुसार पालिकेने स्थापन केलेली वैद्यकीय लेखापरीक्षण समिती अजूनही त्या प्रमाणात कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरूच आहे.क करोनावरील उपचाराकरिता प्रशासनाने दरनिश्चिती केली असली तरी याकडे संबंधीत समतीचे दुर्लक्ष असल्याने ेखासगी रुग्णालयांकडून बिलाचा बाजार मांडला जात आहे. नोकदार मंडळींनी मेडिक्लेम काढलेला आहे. परंतु, मेडिक्लेममध्ये या उपचाराचा समावेश नाही, ही औषधे येत नाहीत अशी कारणे सांगून मेडिक्लेममध्ये बिलाची कमीत कमी रक्कम देण्याचा या कंपन्या प्रयत्न करतात. नियमांच्या चौकटीत अडकवले जात असल्याने मेडिक्लेम असतनाही रुग्णाच्या नातेवाईकाला पैसे भरावे लागत आहेत

तुम्हाला आज डिस्चार्ज आहे, असे सांगितले गेल्यानंतर रुग्ण आणि नातेवाईक खूष होतात. मात्र, डिस्चार्जची फाइल सायंकाळी सहा वाजता पाठविली जाते. साडेआठ नऊच्या सुमारास मेडिक्लेम मंजूर होतो, तो फक्त अर्धवट रकमेचा. बिलाचे पूर्ण पैसे भरल्याशिवाय रुग्णालय डिस्चार्ज देत नसल्याने पैशांची जुळवाजुळव करता करता नातेवाईकांची धांदल उडत आहे. बिल देतो पण, आता उपचार थांबवा असे म्हणण्याची वेळ करोनाबाधितांच्या नातेवाईकांवर आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post