कोल्हापूर जिल्ह्यातील 14 मार्ग बंद

कोल्हापूर जिल्ह्यातील 14 मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु.
PRESS MEDIA LIVE  :  कोल्हापूर  ( अतूल पाटकर ) :

जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 5 राज्यमार्ग व 9 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 14 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 3 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.
पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर चिखली बाजारभोगाव राज्य मार्ग क्र. 193 मार्गावरील करंजफेन गावाजवळ रस्त्यावर 4 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पोहाळे-पोहळेवाडी मार्गाने व मलकापूर यळवण मांजरे अनुस्कुरा मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.
चंदगड तालुक्यातील कोल्हापूर,परिते, गारगोटी,गडहिंग्लज, कोदाळी भेडशी ते राज्यमार्ग हद्द रा.मा. क्र. 189 मार्गावरील चंदगड पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पाटणे फाटा मोटणवाडी फाटा प्रजिमा 76 मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.
चंदगड तालुक्यातील चंदगड, इब्राहिमपूर, आजरा, महागांव, हलकर्णी, खानापूर जिल्हा हद्दीपर्यंत रा.मा.क्र. 201 मार्गावरील इबा्रहिम पुलावर 3 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून रा.मा. 180 ते कनुर गवसे इब्राहिमपूर अडकूर प्रजिमा क्र. 66 ते रा.मा. क्र. 189 प्रजिमा मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.
गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा कोल्हापूर पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, जंगमवाडी राज्य हद्दीपर्यंत राज्य मार्ग क्र. 177 मार्गावरील मांडूकली गावाजवळील ओढ्यावर 2 फूट पाणी व कोडे फाट्याजवळ 2 फूट पाणी आल्याने पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद आहे.
आजरा तालुक्यातील नवले देवकांडगाव, साळगाव प्रजिमा 58 वरील साळगाव बंधाऱ्यावर 3 फुट पाणी आल्याने वाहतूक बंद असून सोहाळे बाची मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला, बाचणी प्रजिमा क्र. 37 मार्गावरील बाचणी बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून कसबा बीड घानवडे प्रजिमा 29 मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.
चंदगड तालुक्यातील गुडवळे, खामदळे, हेरे सावर्डे, हलकर्णी प्रजिमा क्रं.71 मार्गावरील करंजगाव पुलावर 2 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पाटणे फाटा मोटणवाडी मार्गे पर्यायी वाहतुक सुरु आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील निलजी, नूल, येणेचवंडी, नंदनवाड प्रजिमा 86 मार्गावरील किमी -0/750 वरील बंधाऱ्यावर 3 फूट पाणी आल्याने निलजी, नूल मार्गे वाहतूक बंद असल्याने प्रजिमा 80 वरुन दुंडगे- जरळी- मुगळी- नुल मार्गे पर्यायी वाहतुक सुरु आहे.
राधानगरी तालुक्यातील आरे, सडोली खालसा, राशीवडे ब्रु., शिरगाव प्रजिमा क्रं. 35 मार्गावरील शिरगाव बंधाऱ्यावर 2 फूट पाणी असल्याने वाहतुक बंद असून तारळे व राशीवडे मार्गे पर्यायी वाहतुक सुरु आहे.
पन्हाळा तालुक्यातील परखंदळे, आकुर्डे, हारपवडे, गवशी, धुंदवडे, जर्गी, गगनबावडा प्रजिमा क्रं. 39 मार्गावरील गोठे पुलावर 2 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून मल्हार पेठे, सुळे, कोदवडे प्रजिमा 26 मार्गे पर्यायी वाहतुक सुरु आहे.
गगनबावडा तालुक्यातील शेनवडे, अंदूर, धुंदवडे, चौधरवाडी, म्हासुर्ली, कोते, चांदे, राशीवडे बुद्रुक, परीते प्रजिमा क्रं. 34 मार्गावरील अंदूर बंधाऱ्यावर 2 फुट पाणी असल्याने अणदूर, मणदूर, वेतवडे, बालेवाडी प्रजिमा क्रं. 25 मार्गे वाहतुक सुरु आहे.
गगनबावडा तालुक्यातील बाजार भोगाव, किसरूळ, काळजवडे पोंबरे कोलीक, पडसाळी ते काजीर्डा घाटास मिळणारा जिल्हा हद्दीपर्यंत प्रजिमा क्र. 19 मार्गावरील मनवाडा बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने या मार्गावरील वाहतुक बंद आहे.
चंदगड तालुक्यातील राजगोळी कुदनूर कालकुंद्री कागणी किणी नागरदळे कडलगे ढोलगरवाडी मांडेदुर्ग कारवे रामा क्र. 180 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र 65 मार्गावरील मोरीवर 2 फूट पाणी असल्याने वाहतुक बंद असून प्रजिमा 65 ते ढोलगरवाडी गोळवाडी ग्रा मा. 34 मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

Post a comment

0 Comments