कोल्हापूर, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली.
पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

PRESS MEDIA LIVE :  भरत घोंगडे.

कोल्हापूर  : पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोराच्या पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी ४३ फूट वाढलेली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांमधील पाण्याचा विसर्ग सुरुच असल्याने नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा महापुराच्या सावटाखाली आला आहे. कोल्हापूर-गारगोटी, कोल्हापूर-राधानगरी, आंबोली-आजरा, गगनबावडा-जंगमवाडी या प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद झाली.कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पाणी पातळी ओलांडली आहे. तसेच कोल्हापूरकडून कोकणाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. तर पावसाचा जोर सध्या ओसारलेला आहे.

पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट असून धोका पातळी ४३ फूटांवर आहे. आता सध्या पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या परिसरात नदीचं पाणी घुसायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर होण्याची भीती वर्तवली जात आहे.

Post a comment

0 Comments