AdSense code कोल्हापूर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने कुटुंबियासह होम क्वारनटाईन

कोल्हापूर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने कुटुंबियासह होम क्वारनटाईन

सासऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला; शिवसेना खासदार  धैर्यशील माने कुटुंबीयासह होम क्वॉरंटाइन


PRESS MEDIA LIVE. :. कोल्हापूर : अतूल पाटकर. 

सासऱ्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शिवसेनेचे  खासदार धैर्यशील माने हे कुटुंबीयां सहित१४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन झाले आहेत. गेल्या आठ-दहा दिवसात संपर्कात आलेल्यांनीही आरोग्य चाचणी करून घ्यावी, असं आवाहन माने यांनी केलं आहे.
कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे कुटुंबीयांसह १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन झाले आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांच्या सासर्‍यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी कुटुंबीयांसह होम क्वॉरंटाइन होण्याचा निर्णय घेतला. याशिवाय गेल्या चार दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

खासदार धैर्यशील माने हे दांडगा जनसंपर्क असणारे नेते आहेत. करोना संसर्गाच्या काळात रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी त्यांच्याकडून कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आणि कार्यकर्त्यांसोबत वारंवार बैठका दौरे सुरू होते. त्यांच्या सासऱ्यांना करोना संसर्गाची लक्षणे जाणवताच स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. शनिवारी सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर खासदार माने यांनी तातडीने स्वतःसह कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही माहिती दिली असून कार्यकर्त्यांनाही करोनाची लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. होम क्वॉरंटाइन झाल्यानंतर माने हे स्वत:ची करोना टेस्ट करणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या चार दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी वैद्यकीय तपासणी करावी, असे आव्हान त्यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments