मुलाच्या परीक्षेसाठी बापाने 106 किलोमीटरचे अंतर सायकल पार केले.


मुलाच्या परीक्षेसाठी बापाने 106 किमीचं अंतर सायकलने पार  केले.

PRESS MEDIA LIVE : इंदौर :

इंदौर: मध्यप्रदेशातील आशिष हा १० वीचा पेपर देण्यासाठी तब्बल १०६ किलोमीटरचा प्रवास करायचा. त्याचे वडील शोभाराम आशिषला सायकलवर घेऊन जायचे. टाइम्स वृत्त समूहाच्या एका पत्रकाराने ही बातमी केली. त्यानंतर ही बातमी वाऱ्याप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल झाली.

यावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याची माहिती दिली. महिंद्रा यांनी ट्विट केलंय,”एक वीर पालक. आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी धडपड करत आहे. हेच स्वप्न देशाला पुढे जाण्यासाठी उत्तेजन देत आहे. आमचे फाउंडेशन आशिषच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलेल.”

सध्या कोरोनामुळे मध्यप्रदेशातील बस आणि सार्वजनिक वाहतूक बंद आहे. शोभाराम यांनी परीक्षा न देण्याचे ठरवलं होतं पण मुलाची जिद्द पाहून वडीलही तयार झाले. मुलाची जिद्दीसाठी शोभाराम यांनी तब्बल १०६ किलोमीटर सायकलवरून प्रवास केला.

आशिष नववीत असताना सरकारी योजनेअंतर्गत त्याला ही सायकल मिळाली होती. गावातील कोणीही त्यांना मदत केली नाही, असं शोभराम यांनी सांगितलं.


          

Post a comment

0 Comments