इचलकरंजी : प्रबोधनी लोकमान्य व लोकशाहीरांना आदरांजली

प्रबोधिनीत लोकमान्य व लोकशाहीरांना आदरांजली.





PRESS MEDIA LIVE. :. इचलकरंजी. :

इचलकरंजी ता.१,लोकमान्य टिळकांनी केलेल्या जनजागरणाने भारतासह जगभरच्या अनेक पारतंत्र्यात खितपत पडलेल्या देशांतील जनतेला साम्राज्यवादी शक्तींविरोधी लढण्याची प्रेरणा मिळाली हे ऐतिहासिक सत्य आहे.तसेच आपल्या मावसभावाच्या तमाशात काम करणाऱ्या अण्णा भाऊं साठे यांनी एका सभेत क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले.त्या भाषणाने प्रभावित होऊन अवघ्या सोळा वर्षाच्या अण्णा भाऊंनी परिस्थितीची हाक ओळखून स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून दिले.लोकमान्य राजकीय स्वातंत्र्यासाठी तर अण्णा भाऊ सामाजिक स्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणी,वाणी आणि कार्यकर्तृत्वातून लढले असे मत प्रा.रमेश लवटे यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने लोकमान्यांची स्मृतिशताब्दी व लोकशाहिरांची जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलत होते.प्रारंभी शिवाजी शिंदे व पांडुरंग पिसे यांच्या हस्ते या दोन्ही महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.यावेळी प्रसाद कुलकर्णी,शशांक बावचकर,नंदकिशोर जोशी,शंकरराव भाम्बीष्टे,रोहन पाटील, संदीप गुरव आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post