हुपरी येथील मेदांत हॉस्पिटलची मान्यता रद्द करा

 हुपरी येथील मेदांत हॉस्पिटलची मान्यता रद्द करा रिपब्लिकन पार्टी ऑफइंडिया(आ) कोल्हापूर                                      

            PRESS MEDIA LIVE : हुपरी :

रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी असलेले अमीन मुल्ला ३१ वर्षाचा हुपरी स्टँड वरील गजरे विकणारा युवक होता त्याची प्रकृती २२ ऑगस्ट रोजी अस्वस्थतेमुळे मेन रोड हुपरी येथील मेदांत होगाडे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सदर च्या रुग्णांची HRCT टेस्ट केली असता त्याचा स्कोर ३०/४०आला होता सदर हॉस्पिटलने त्या रुग्णांचा रिपोर्ट पाहून निमोनिया झाल्याचे नातेवाईकांना सांगितले त्यानंतर हॉस्पिटल मॅनेजमेंट सदर रुग्णांना ३ लाखाचे पॅकेज देऊन नातेवाईकांना ५० हजार रुपये जमा करण्यास तगादा लावला नातेवाइकांनी २३तारखेला ५० हजार रुपये भरले त्याच्यानंतर नातेवाईकानी पेशंटचे कंडीशन काय विचारणा केली त्यानंतर असे निदर्शनास आले की सदर हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर हे Covid-१९ पॉझिटिव आहेत ते डॉक्टर होम क्वारंटाईन आहेत असे निदर्शनास आले मग सदरच्या रुग्णावर उपचार कोणी केला हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे सोमवारी दि.२४/०८/२०२०.रोजी रुग्णांची जास्तच तब्येत खालावल्याने हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने पेशंट येथून हलवून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असे नातेवाईकांना सांगण्यात आले.त्या रुग्णाचे २४/०८/२०२०रोजी सकाळी उपचाराअभावी त्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला  त्याच्यानंतर संबंधित नातेवाईकांना ३५ हजार रुपये भरून डेड बॉडी घेऊन जा असे हॉस्पिटल मॅनेजमेंट कडून सांगण्यात आले संबंधित नातेवाईकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आ) जिल्हा नेते आयु: सतीश माळगे(दादा)व हातकणंगले चे युवा नेते आयु: चरणदास कांबळे यांना फोन वरून माहिती दिल्यानंतर कोल्हापूरहून मेदांत हॉस्पिटल हुपरी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाकडून धडक दिली धडक दिल्यानंतर तुम्ही विना पैसे भरता डेड बॉडी घेऊन जा असे बोलण्यात आले आणि ती बॉडी कोरना पॉझिटिव्ह आहे असे हॉस्पिटल मॅनेजमेंट कडून सांगण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सतीश माळगे(दादा)आणि चरणदास कांबळे यांनी हॉस्पिटलला मॅनेजमेंट ला प्रश्नांचा भडीमार केला की बॉडी पॉझिटिव्ह असताना नातेवाईकांच्या ताब्यात देताच कसे संबंधित  रुग्णावरती तुमच्या हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर कोरणा पॉझिटिव असताना ते क्वारंटाईन असताना त्या रुग्णावर ती उपचार कोणी केला याचा खुलासा करावा ज्या कोणी उपचार केले आहे त्यांचे सर्टिफिकेट दाखवा.पण एकाही प्रश्नाला उत्तर न देता हॉस्पिटल मॅनेजमेंट उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले संबंधित हॉस्पिटलचे ज्याने उपचार केले  आहेत ते डॉक्टर समोर आले नाहीत ह्या हॉस्पिटलची गचाळ आणि जीवघेणा प्रकार बघून रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि संबंधित हुपरी पोलीस स्टेशनच्या दारात जाऊन घोषणाबाजी केली.मेदांत हॉस्पिटलची मागणी रद्द करा संबंधित उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्या कर्मचाऱ्यांची कडकातले कडक शासन करा खाजगी हॉस्पिटल आणि चालवलेली गोरगरीब रुग्णांची लूट थांबवा अशा मागण्यांचे निवेदन हुपरी पोलीस स्टेशन म्हस्के साहेब यांच्या मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी साळे साहेबयांच्या नावे देण्यात आले यावेळी आयु सतीश माळगे आयु चरणदास कांबळे आयु संभोधी कांबळे आयु मुरली शिंगे आयु नितीन कांबळे सरताज मुल्ला यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्ष्यांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.* 

                                                                                                                                                                   

  *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इत(आ)* 

  *शुभम शिंदे  सामाजिक कार्यकर्ते रेंदाळ*

Post a comment

0 Comments