चिप्री अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आणि साहित्य प्रेरणादायी. सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

आण्णाभाऊ साठे यांचे कार्य आणि साहित्य प्रेरणादायी

सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
PRESS MEDIA LIVE. :.  चिपरी. :

सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन आपल्या असामान्य कर्तृत्वाने जगाला आपली वेगळी ओळख निर्माण करून
देणाऱ्या साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे कार्य, आणि त्यांनी लिहिलेले साहित्य जगासाठी प्रेरणादायी आहे असे उदगार महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले,
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या आण्णाभाऊंनी वंचित, उपेक्षित आणि कष्टकऱ्यांचा आवाज आपल्या साहित्या मधून सर्वांसमोर मांडला असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले,
साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शनिवारी शिरोळ तालुक्यामधील विविध गावांमध्ये जयंती कार्यक्रमांना उपस्थित राहून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले, चिपरी, यड्राव, शेडशाळ, तसेच जयसिंगपूर शहरामधील  आण्णाभाऊ साठे नगर, संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमांना ही त्यांनी भेटी दिल्या, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या समोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या बद्दलच्या भावना राज्यमंत्री यड्रावकर यांनी व्यक्त केल्या, आण्णाभाऊंच्या बद्दल बोलताना राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले,शाळेची पायरी ज्यांनी हयातीत चढली नाही, अशा सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आण्णाभाऊंनी कथा, कादंबऱ्या, नाटके, वगनाट्य, लावण्या अशा सर्व प्रकारचे चौफेर लेखन साहित्य मराठी साहित्याला दिले, गोवा मुक्तिसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मध्ये प्रबोधनाचे त्यांनी केलेले काम अतुलनीय असे आहे, त्यांनी लिहिलेले मराठी साहित्य जगभरातील 27 भाषांमध्ये भाषांतरीत केले गेले आहे यावरून त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याची उंची ध्यानात येते, त्यांच्या याच कार्याची आणि प्रतिभेची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना देशातील सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार  मरणोत्तर जाहीर करावा अशी मागणी मी शासनाकडे केली आहे, यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाची शिफारस करावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सुद्धा माझ्यासह जनतेच्या भावना मी कळवल्या आहेत असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितले,
चिपरी येथे आण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय बोरगावे, चिपरी चे माजी सरपंच बबन यादव, सुभाष मगदूम, तात्यासो पाटील, आनंदा पांडव, नबीलाल नदाफ, बाबासो काडे, भरत कांबळे, अरुण कांबळे, धनाजी कांबळे, विशाल कांबळे, रणजीत आवळे, विलास कांबळे, राजाराम माने, रावसाहेब पाटील, प्रमोद कांबळे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते,
इंदीरानगर यड्राव येथे मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी महावीर पाटील, शामराव आदमाने, अर्जुन आदमाने, बाळासो कांबळे, प्रमोद सकटे, मिथुन बिरांजे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते, शेडशाळ येथील कार्यक्रमा दरम्यान दादेपाशा पटेल, भोला तकडे, विजय कोळी, सरपंच सौ. पोतदार, रावसाहेब महाडिक, बापू भंडारे, विजय शहापुरे, राजीव आवळे, मल्हारी आवळे, बाबू तुरकेकर यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते,
जयसिंगपूर येथील आण्णाभाऊ साठे नगरात आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमा प्रसंगी लक्ष्मण सकटे, कैलास काळे, श्रीपती सावंत (सर), चारू कांबळे, शशिकांत घाडगे, निशिकांत साठे तसेच महावितरणचे अधिकारी मकरंद आवळेकर व मान्यवर उपस्थित होते,
संभाजीनगर जयसिंगपूर येथे आण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमास नगरसेवक गणेश गायकवाड, महेश कलकुटगी, चंद्रकांत भंडारे, भरत आवळे, अर्चना आवळे, गणेश आवळे, प्रदीप लोंढे, राहुल आवळे, अशोक भंडारे, सागर खांडेकर, सतीश भंडारे, विनायक गायकवाड, संदीप शिंदे, अमोल सरवदे, अजित पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

0 Comments