अब्दुल लाट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सच्चा शिलेदार हरपला

अब्दुल-लाट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सच्चा शिलेदार हारपला..



PRESS MEDIA LIVE :. अब्दुल लाट 

  आपल्या गावतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना २००२ मध्ये झाली तेव्हापासून मी व माझे सहकारी संघटने मध्ये सक्रिय आहोत त्यानंतर २००८ पासून माझा व शितलचा संघटनेच्या निमित्ताने संपर्क सुरु झाला तेव्हापासून आम्हा सर्वांबरोबरच प्रत्येक आंदोलनामध्ये हिरीरीने सहभाग घेऊन लाटेतील चळवळीस उभारणी दिली.
        नाव जसे शितल तसेच मनाने देखिल ‘शितल’ असे व्यक्तिमत्व पण प्रसंगी आक्रामक भूमिका घेऊन परिस्थितीवर मात कशी करवी ही त्यांची दोन्ही रूपे आम्हाला अनुभवास मिळाली. मराठी , हिंदी , इंग्लिश तसेच कन्नड़ या सर्वच भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते व त्यांच्या व्यक्तिमत्वातून ते अगदी उठून दिसत होते.त्याचबरोबर माझ्या व माझ्या सहकार्यांसाठी वेळ प्रसंगी भावाप्रमाणे धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणजे शितल.
       पर्वाच झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनामध्ये आसणारा त्यांचा सहभाग हा शेवटचा सहभाग असेल असे स्वप्नातदेखिल वाटले नव्हते तुमच्या अचानक जाण्याने संघटनेमध्ये निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन निघणारी नाही.
*आशा माझ्या हरहुन्नरी मित्रास अखेरचा सलाम....!*
आपल्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शोकाकुल - राजू नाईक (अध्यक्ष-स्वा.शे.सं)

Post a Comment

Previous Post Next Post