सिंधुदुर्गनगरी . आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तर्फे

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तर्फे सिंधुदुर्गातील कोविड योद्द्यांचा गौरवPRESS MEDIA LIVE : सिंधुदुर्गनगरी :  (गणेश राऊळ ) ;

सिंधुदुर्ग नगरी :-  संपूर्ण जगात कोरोनाच्या कोविड १९ सारख्या दुर्धर रोगाने थैमान घातले आहे त्यात लाखो लोकांचा बळी गेलेला आहे हा रोग संपर्कातून फैलावत असल्याचे निष्पन्न झालेले आहे तरी देखील शासकीय कर्मचारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे सदस्य, प्रतिनिधी, सफाई कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करत आहे त्यांची दखल घेणे गरजेचे आहे
      आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स ही संघटना गेली कित्येक वर्षे सन्माननीय संस्थापक अँड विक्रांतजी वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून संस्थेच्या वतीने मागील ४ वर्षांपासून अन्नदान सेवा अखंडितपणे सुरू आहे.  त्याच सोबत गोरगरिबांना मदत, शाळेपयोगी वस्तू वाटप, कोरोनाच्या काळात अन्नधान्य मास्क वाटप अश्या प्रकारचे अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतात.
सध्या कोरोना प्रादुर्भाव च्या काळात कोविड रोखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आपली अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या योद्धांचा सन्मान करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अश्या योद्द्यांचा
संस्थापक सन्माननीय अँड विक्रांतजी वाघचौरे यांच्या आदेशाने, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी सन्माननीय समिरजी परब यांच्यापासून प्रेरणा घेत महाराष्ट्र युथ सेल चे संचालक गणेश राऊळ यांच्या प्रयत्नाने संघटनेच्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यात सिंधुदुर्गातील शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, पत्रकार, सेवाभावी संघटना, राजकीय नेतृत्व, समाजसेवक यांचा समावेश आहे

Post a comment

0 Comments