सरपंच सेवा महासंघ :

मुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर सरपंच यांचीच प्रशासक म्हणून नेमणूक करावी......

   सरपंच सेवा महासंघाची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी..
PRESS MEDIA :  गणेश राऊळ :

राज्यावर कोरोनाचे संकट आलेले असुन मुदत संपलेल्या 12668 ग्रामपंचायतच्या निवडणुका पुढे ढकलल्या असुन ग्रामपंचायत वर प्रशासकाची नेमणूक ग्रामपंचायत  अधिनियम कलम 151 नुसार योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून ग्रामपंचायत वर नेमणूक करणेसाठी राज्य सरकारला अधिकार देण्यात आले आहेत
   तरी ज्या सरपंचांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहेत आशा सरपंचांना ग्रामपंचायत प्रशासनाचा चांगला अनुभव असल्यामुळे त्यांनाच प्रशासक पदी नेमणूक द्यावी म्हणजे ग्रामपंचायतचे माध्यमातून गावाचा विकास चांगल्या प्रकारे होईल.
    सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र यांचे मागणीचा विचार करून येत्या बुधवारी  कॅबिनेटच्या मिटींग मधे *सरपंच प्रशासक* नेमणुकीचा ठराव पास करावा आशा मागणीचे निवेदन मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईमेल द्वारे निवेदन पाठविलेले आहे
व निवेदनावर राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील, सोशल मिडीया राज्य प्रमुख भाऊसाहेब कळसकर, कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे,उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, संपर्क प्रमुख राहुल उके,महीला राज्य उपाध्यक्ष वंदना गुंजाळ, राज्य सल्लागार हनुमान सुर्वे, रामनाथ बोराडे,नलिनी शेरकुरे आदिच्यां सह्या आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post