पुणे या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी.


या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी.PRESS MEDIA LIVE. :  पुणे : ( मोहम्मद जावेद मौला. ) :


पुणे- राज्यातील दुकाने, कार्यालये येत्या एक ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्यातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन महाराष्ट्रकडून (फाम) करण्यात आली आहे. याबाबत फामकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंगळवारी निवेदन देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी दिली.

गेल्या महिन्यात 5 जूनपासून शासनाने सम-विषम दिनांकानुसार दुकाने खुली ठेवण्याची मुभा दिली आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन राज्यभरातील व्यापारी काटेकोरपणे करत आहेत. राज्य सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निर्बंध शिथिल केले असले तरी अद्याप व्यापारी स्थिरावले नाहीत. अपेक्षित व्यवसाय होत नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक खरेदीसाठी बाहेर पडू शकत नाही. गेल्या चार महिन्यांपासून व्यापार बंद असल्यासारखा आहे. कामगारांचे पगार, दुकान भाडे, वीज बिल, कर भरणा हे खर्च व्यापाऱ्यांना करावे लागत आहेत. व्यापार पूर्वपदावर आल्यास अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी मिळेल. यासाठी ही मागणी करण्यात आल्याचे राजेश शहा यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना फामकडून राज्यभरातील व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखून व्यवहार करणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे शहा यांनी सांगितले

Post a comment

0 Comments