पुणे :

पुणे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसकर यांनी स्वतः घरी होमक्वारंटाईन करून घेतले.



PRESS MEDIA LIVE :  पुणे : मोहम्मद जावेद मौला.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या वाहनचालकाला कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे डॉ. म्हैसेकर यांनी स्वतः घरी विलगीकरण (होम क्वारंटाइन) करून घेतले आहे. त्यांचीही कोरोना चाचणी होणार असून, अहवाल येईपर्यंत घरूनच कामकाज करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून डॉ. म्हैसेकर हे स्वतः उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अधिकार्‍यांच्या बैठकांमध्ये ते सहभाग घेत आहेत. तसेच, पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन दरम्यान, त्यांच्या वाहनचालकाला कोरोनाची लक्षणे आढळून आली. वाहनचालकाचा चाचणी अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉ. म्हैसेकर यांनी स्वतः घरी विलगीकरण (होम क्वारंटाइन) करून घेतले. डॉ. म्हैसेकर यांनी स्वतः घरीच विलगीकरण करून घेतले असून, काही दिवस ते घरूनच कार्यालयीन कामकाज पाहणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

वाहनचालकाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे स्वतः होम क्वारंटाइनचा निर्णय घेतला आहे. 'आयसीएमआर' च्या मार्गदर्शक तत्वानुसार पाच दिवसानंतर चाचणी करून घेण्यात येईल. तोपर्यंत
काही दिवस घरूनच कार्यालयीन कामकाज पाहणार आहे.
- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे. पाहणी करीत आहेत.

Post a comment

0 Comments