पुणे : लॉक डाऊन :


लॉकडाऊन च्या कडक अमलबजावणसाठी मनपा प्रशासन सज्ज.


PRESS MEDIA LIVE :  पुणे : ( मोहम्मद जावेद मौला ) :

पुणे – लॉकडाऊनची शिथिलता विभागीय आयुक्‍तांनी रद्द केली असून, मंगळवारपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. दूध आणि औषधांशिवाय काहीच उपलब्ध होणार नसून, नागरिकांनी पूर्ण सहकार्य केल्यास करोना विषाणूची साखळी तोडण्यास मदत होईल, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. या लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनही सज्ज झाले असून, ठिकठिकाणी पुन्हा एकदा बॅरिकेडिंग केले जात आहे. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे, तेथे हे बॅरिकेडिंग केले आहे. याशिवाय अत्यावश्‍यक सेवाही सुरू ठेवण्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयात 10 टक्‍के कर्मचाऱ्यांचे नियोजन केले आहे.

मात्र, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची पूर्ण उपस्थिती आवश्‍यक करण्यात आली आहे.उद्यापासून रस्त्यावर कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका, पोलीस प्रशासन यांच्याकडून करण्यात आले आहे. दि. 18 जुलैपर्यंत ही कडक अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर काही अंशी हे लॉकडाऊन शिथिल केले जाणार आहे. या लॉकडाऊनमध्ये व्यापारी वर्गही सहभागी होणार आहे.  उद्योगांचे पास पुरेसे
उद्योग आस्थापनांनी त्यांच्या कामगार कर्मचाऱ्यांना दिलेले पास पुणे, पिंपरी पालिका व ग्रामीण भागात ये-जा साठी पुरेसे ठरतील. वेगळे पोलीस पास काढण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. हवेली आणि मुळशी तालुक्‍यात लॉकडाऊन
हवेली तालुक्‍यात वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, उरुळीकांचन, कुंजीरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडकी, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, डोणजे, खानापूर, थेऊर, मुळशी – नांदे, भूगाव, भुकुम, पिरंगुट, घोटावडे, हिंजवडी या गावांत लॉकडाऊनच नियम लागू असतील.

Post a Comment

Previous Post Next Post