पुणे :


लॉकडाउनच्या नियमांचे नागरिकांनी पालन करून खरेदी करावी .  रवींद्र शिसवे


PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला.

लॉकडाऊनमध्ये रविवारी महापालिकेने काही अंशी सुट देऊन दुकाने ठराविक कालावधीसाठी उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. आखाड महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने नागरिकांची मटण व चिकण खरेदी करण्यास मोठी झुंबड उडण्याची शक्‍यता आहे. यामुळे सोशल डिस्टंन्सचा  फज्जाही उडू शकतो. ही शक्‍यता लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे पालन करुन खरेदी करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सह आयुक्त रविंद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी रविवारसाठी नागरिकांना काही सूचनाही व्टिटरव्दारे केल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंस पाळणे आणि मास्कचा वापर करण्यास सांगितले आहे. करोनाचा धोका अद्याप टळलेला नसून आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत होणे आवश्‍यक आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून गरजेच्या कामासाठीच बाहेर पडावे. तसेच सार्वजनीक ठिकाणी गर्दी करु नये.करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन लॉक डाऊनच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहनही सह आयुक्त रविंद्र शिसवे यांनी केले.


दरम्यान, लॉक डाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आजही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यामध्ये विनापरवाना संचार करणारे (201), विनापरवाना संचार करणाऱ्या वाहनांवरील कारवाई(51) , जप्त करण्यात आलेली वाहने (115) , विना मास्क वाहनांवरील कारवाई(105) अशा प्रकारे कारवाई केली गेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post