पुणे कात्रज दूध डेअरी दूध उत्पादक संघ बाबत सोशल मीडिया मधून दिशा भूल करणारे संदेश फिरत आहेत.

कात्रज डेअरीबाबत दिशा भूल करणारे संदेश चुकीचे- विष्णूहिंगेPRESS MEDIA LIVE ; पुणे  (प्रतिनिधी) :


 पुण्यातील अग्रगण्य कात्रज दूध डेअरी, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ बाबत सोशल मीडिया मधून काही दिशाभूल करणारे संदेश फिरत आहेत. हे संदेश साफ चुकीचे असून संबंधित जे कोणी हा प्रकार करत असेल त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे कात्रज दूध उत्पादन संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांनी  सांगितले.

याबाबत कात्रज डेअरी कडून निवेदन देखील प्रस्तुत करण्यात आले आहे. कात्रज डेअरी च्या एका ज्येष्ठ सेवकाचे रुग्णालयात निधन झाले होते. निधन होण्यापूर्वी ते बारा दिवस कामावर आले नव्हते. त्यांना कोरोना संसर्ग झाला होता किंवा नाही याबाबत अधिकृत माहिती नाही. तरीदेखील संघाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून विभागातील सेवकांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नसतानाही अलगीकरणात ठेवण्यात आले.  शिवाय त्यांची तपासणी देखील केली आहे त्यामध्ये त्यांचा अहवाल नकारात्मक देखील आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून  कात्रज डेअरी मध्ये करून रुग्ण आढळलेला असून कात्रज दूध किंवा अन्य पदार्थ घेऊ नये, अशा आशयाचे संदेश समाज माध्यमांमधून फिरत आहेत. याबाबत संघ संबंधितांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणार असून त्यामुळे डेअरी बद्दल दिशाभूल करणाऱ्या अफवांवर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये, असे संघाच्या निवेदनात म्हटले आहे.

कात्रज येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरी येथे करोनाचा पार्श्वभूमीवर मार्च महिन्यामध्ये लॉकडाउन झाल्यापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे. डेअरीच्या परिसरामध्ये सॅनिटायझर टनल असून त्यामार्फत ग्राहक व कर्मचाऱ्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. कर्मचाऱ्यांची  दैनंदिन तापमान तपासणी, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण, शिवाय मास्क वापरूनच  प्रवेश दिला जात आहे.

Post a comment

0 Comments