पुणे : माजी नगरसेवक विजय माटकर

माजी नगरसेवक विजय शंकराव मारटकर यांचे कोरोनाने निधन.PRESS MEDIA LIVE :. पुणे : मोहम्मद जावेद मौला :

शिवसेनेचे लढवैये नेते आणि माजी नगरसेवक विजय शंकरराव मारटकर (वय 67) यांचे मंगळवारी सायंकाळी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. त्यांना कोरोनाबरोबराच इतर आजारांची संसर्ग झाला होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. कसबा विधानसभा मतदार संघाचे युवासेनेचे प्रमुख दीपक मारटकर यांचे ते वडील होते.

मारटकर यांना गेल्या बुधवारी श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने दीनानाथ रुग्णालयात ते कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी दुपारी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. यापूर्वी त्यांची दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली होती. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच शिवसैनिकांनी रुग्णालयात धाव घेतली.

मारटकर हे 2002 मध्ये प्रभाग पद्धतीने झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा महापालिकेवर शिवसेनेकडून निवडून आले. त्यानंतर 2007 मध्ये वॉर्ड पद्धतीने झालेल्या निवडणुकीतही विजयी होऊन दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. त्यापूर्वी कसबा विधानसभा मतदार संघाचे विभागप्रमुख त्यांनी काम केले होते. बुधवार पेठेतील देवदासींचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केली. त्यांच्या जनसंपर्क चांगला होता. दाखल करण्यात आले होते.

Post a comment

0 Comments