पुणे कॉम्प्युटर हार्डवेअर मोबाईल दुरूस्ती विषयक

                                                             कॉम्प्युटर हार्डवेअर,मोबाईल दुरुस्तीविषयक मोफत वेबिनारला चांगला प्रतिसाद                            

 

PRESS MEDIA LIVE : पुणे (प्रतिनिधी ) :

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै-आयसीटी अकॅडमी तर्फे कॉम्प्युटर हार्डवेअर आणि मोबाईल दुरुस्ती विषयावर मोफत राष्ट्रीय पातळीवरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.  कॉम्प्युटर हार्डवेअर विषयावरचा वेबिनार २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आणि मोबाईल दुरुस्ती विषयावरील वेबिनार २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता झाला.सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार,पै-आयसीटी अकॅडमीच्या संचालक मुमताज सय्यद,आरिफ याकुब सय्यद यांनी कार्यशाळेच्या हेतुविषयी मार्गदर्शन केले.

आलिया आरिफ सय्यद,रफिक युसुफ खान,सोफियान सादिक पठाण,मोहम्मद शेख,मोहम्मद नेमातुल्ला शेख,मोहम्मद कैफ शेख,हुझाफ बागवान यांनी प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. कॉम्प्युटर हार्डवेअर विषयक  वेबिनार मध्ये ४९७ जण सहभागी झाले .मोबाईल दुरुस्ती विषयावरील वेबिनार मध्ये ६८१ जण सहभागी झाले.

Post a comment

0 Comments